Download App

तब्बल 27 वर्षांनी भाजपने दिल्लीचं मैदान कसं मारलं? जाणून घ्या भाजपच्या विजयाची 10 कारणं

Delhi Election मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे.

Delhi Election Results BJP Won after 27 years : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु असून सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 1993 मध्ये भाजपने शेवटची दिल्लीतील निवडणूक जिंकली होती. मात्र तब्बल 27 वर्षांनी भाजपने दिल्लीचं मैदान कसं मारलं? हे जाणून घेऊन…

आप सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप :

भाजपच्या विषयाचे पहिले मोठे कारण आहे. ते म्हणजे आम आदमी सरकारवर झालेले भ्रष्टाचारांचे आरोप. त्यामध्ये आपने 2021 मध्ये आणलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरण यावरून भाजपने आप सरकारमधील घोटाळे बाहेर काढले आणि पक्षातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मोठे नेते जसे मनिष सिसोदिया सत्येंद्र जैन यांना देखील कारागृहात जावं लागलं. जो पक्ष एकीकडे भ्रष्टाचाराचा विरोध करणारा पक्ष म्हणून स्थापन झालेल्या पक्षाचे नेत्यांनी भ्रष्टाचार केला जातोय हा डाग आपला पुसता आला नाही. भाजपने हा मुद्दा कायम तापवत ठेवला.

केजरीवालांच्या मुख्यमंत्री निवासावरी कोट्यावधींचा खर्च :

भ्रष्टाचारानंतर भाजपने आप सरकारवर आरोप केले. ते म्हणजे मुख्यमंत्री निवासच्या सजावटीसाठी लागलेल्या खर्चावर त्यामध्ये रुपये खर्च करण्यात आले. असा आरोप भाजपकडून वारंवार लावून त्याला त्याचबरोबर पंतप्रधान त्यांच्या भाषणामध्ये देखील अनेकदा उपस्थित केला. ते म्हटले मी देखील असा आरसे महाल बनवू शकलो असतो. मात्र मला जनतेचे पक्के घरं हवे होते. त्यामुळे भाजप या आरोपांचा जनतेचे मतपरिवर्तन करण्यासाठी योग्य वापर करून घेऊ शकले.

नागरि सुविधांचा आभाव

तिसरा मुद्दा होता तो म्हणजे दिल्लीतील नागरिकांची होत असलेली गैरसोय शहरातील गटारं तुंबली होती. रस्त्यावर घाण सांडपाणी वाहत होतं. रस्त्यांची दुरावस्था झाली होती. लोकांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आम आदमी पक्षाने याकडे लक्ष न देता केवळ भाजपचा महानगरपालिकेचा हस्तक्षेप आहे. या आरोपांवर जास्त भर दिला. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला.

प्रदुषित पाणी

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केजरीवाल हे राजेंद्र नगरमध्ये एका ठिकाणी नळाचं पाणी किती शुद्ध आहे. हे दाखवत होते. मात्र त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी नळाला कशा प्रकारे अस्वच्छ पाणी येत आहे. हे भाजपच्या लोकांनी वारंवार दाखवलं. ज्यामुळे केजरीवालांचा दावा खोटा ठरला. नागरिकांचा विश्वास असाच हळू हळू आपने गमावला.

स्वाती मालीवाल… ‘आप’मध्येच राहुन लावला केजरीवालांच्या ‘तख्ताला’ सुरुंग

त्याचबरोबर अगोदर पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर भाजपच्या तळा गळातील कार्यकर्त्यांनी देखील आप आणि केजरीवालांना दिल्लीवर आलेलं एक संकट असल्याचा प्रचार केला. एका भाषणात मोदी यांनी आप आणि केजरीवालांना दिल्लीवर आलेलं एक संकट म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने हाच मुद्दा लावून धरला.

दिल्लीच्या जनतेकडून भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त; विजयानंतर शाहांची आपवर टीका

त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनिती आखली होती. त्यासाठी गेले कित्येक दिवसांपासून भाजपचे तळागाळातील नेते दलित, शोषित आणि झोपडपट्ट्यांना भेटत होते. गेले किती दिवसांपासून भाजपचा हा प्रचार सुरू झाल्यामुळे आपची वोट बँक हातातून निसटली. त्याच बरोबर जेथे झोपडीत तेथे घर ही योजना देखील भाजपने प्रभावीपणे राबवली.

Delhi Election : 27 वर्षांचा वनवास संपला… मायक्रो प्लॅनिंगने भाजपचे दिल्लीत थाटात पुनरागमन

त्याचबरोबर भाजपला नेहमीप्रमाणे त्यांच्या मातृ संस्था असलेल्या आरएसएसचा फायदा झाला. भाजपच्या विजया मागे पडद्यांमधून काम करणारी आरएसएस गेल्या किती दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती करत होती.

CM पित्याचा वारसा, शिक्षण अन् राजकारणातही अव्वल; केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा कोण?

कुठल्या निवडणुकीमध्ये उमेदवाराची निवड यामध्ये अर्धा विजय निश्चित असतो तीच खेळी भाजपने दिल्लीत खेळली त्यांनी अत्यंत ताकद पण उमेदवार दिले. भाजपच्या उमेदवारांनी मोठी कामगिरी नाही केली मात्र या उमेदवारांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश केला. जास्त कार्यकर्ते पक्षाच्या कामाला लागले. ज्यामध्ये प्रवेश वर्मा, रमेश बिधुडी, दुष्यंत गौतम यासारख्या उमेदवारांचा समावेश आहे.

केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?

दिल्लीमध्ये भाजपचा प्रभाव पडण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला. तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपने जोरदार प्रचार करत दिल्लीमध्ये सात जागा जिंकल्या होत्या. प्रचाराचा तोच धडाका कायम ठेवत दिल्ली विधानसभेतही जोरदार कामगिरी केली.

Delhi Assembly elections : इंडिया आघाडीतील पक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय, रोहित पवार थेट बोलले

त्याचबरोबर भाजपच्या विजयाचं आणखी एक कारण म्हणजे मध्यमवर्ग. यांनी देखील भाजपच्या विजयात मोठी कामगिरी बजावली. कारण भाजपने गेल्या वर्षी त्याचबरोबर यावर्षीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. त्याचा मोठा प्रभाव दिल्लीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या मध्यमवर्ग आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वोट बँकेवर पडला.

अशा प्रकारे दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज अखेर समोर आला.

follow us