Download App

Delhi Flood : दिल्लीत पुराने हाहाकार! केजरीवालांनी सांगितलं कशामुळे आलं संकट?

Delhi Yamuna Flood : राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे 1978 मधील 207.49 मीटरचा आतापर्यंतचा रेकॉर्डही मोडला गेल्याचे दिल्ली जल प्राधिकरणाने सांगितले आहे. आज दुपारी नदीतील पाणी 207.55 मीटर या पातळीवर वाहत होते. या प्रकाराने दिल्ली सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची बैठक घेण्यात आली.

नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असताना पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खालील भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी 45 नौका तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडमध्ये आहे.

सध्याची परिस्थिती पाहता दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पूरग्रस्त भागात 144 कलम लागू केले आहे. काही दिवसांपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काल रात्रीपासूनच अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. लोकांना खाद्य पदार्थ आणि पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे. पाणी ओसरण्याची वाट पाहत लोक घरांच्या छतावर उपाशीपोटी बसून आहेत. येथे कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. लोक घरातच कोंडून पडले आहेत.

यानंतर आता नदीची पाणी पातळी आज रात्री आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज जल प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की दिल्लीसाठी ही गुड न्यूज नक्कीच नाही. मागील दोन दिवसांत दिल्लीत पाऊल पडलेला नाही. तरीसुद्धा यमुना नदीतील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. याचे कारण शेजारील हरियाणा राज्यातील हथिनी कुंड येथून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात केंद्र सरकारनेच हस्तक्षेप करावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

Crime : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली : तुकड्या-तुकड्यांमध्ये आढळला युवतीचा मृतदेह

 

Tags

follow us