Delhi murder : एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने 4० वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. दरम्यान, राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय.
A 16-year-old girl stabbed to death by her boyfriend, identified as 20-year-old Sahil in Shahbad Dairy PS limits of Delhi. Sahil and the deceased were in a relationship but yesterday they had a quarrel. The deceased was planning to attend her friend's son's birthday when the…
— ANI (@ANI) May 29, 2023
नेमकं काय घडलं?
घटनेतील आरोपी साहिलचे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये अज्ञात कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर अल्पवयीन मुलगी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असतानाच दिल्लीच्या रोहिणी भागात आरोपी साहिलने तिच्यावर चाकून वार करण्यास सुरुवात केली.
SRH : काव्या मारनच्या हास्याला झाले 7 वर्ष; आजच्याच दिवशी हैदराबादने रचला होता इतिहास
वार करीत असताना साहिलच्या डोक्यात आपल्या प्रेयसीवषयी एवढा रोष होता की त्याने अल्पवयीन मुलीला तब्बल 40 वेळा चाकूने भोसकले. त्यानंतर चाकू तिच्या डोक्यात अडकल्यानंतर साहिलने तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर दगडाने तिचं डोकं ठेचलं.
विशेष म्हणजे ही साहिल मुलीवर वार करीत असताना लोकं येत जात होती पण कोणीही मध्यस्थी करुन त्याला अडवलं नसल्याची माहिती समोर आलीय.
IPL 2023 Final CSK GT Team: धोनी-हार्दिक खेळणार या प्लेइंग 11 सोबत! फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?
निर्घृण हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपी साहिल हा घटनेनंतर फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.