IPL 2023 Final CSK GT Team: धोनी-हार्दिक खेळणार या प्लेइंग 11 सोबत! फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?
IPL 2023 Final CSK GT Team: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा ग्रँड फिनाले आज (28 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. या चुरशीच्या सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न असतील की, पांड्या आणि धोनी कोणत्या संघासह मैदानात उतरतील.
जर सर्व काही ठीक झाले तर, दोन्ही कर्णधार विजयी संयोजनात छेडछाड करणार नाहीत. क्वालिफायर 1 च्या सामन्यात धोनीच्या संघाने गुजरातचा पराभव केला. 23 मे रोजी झालेल्या या सामन्यात चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवला होता. चेन्नईचा गुजरातविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध गुजरातचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले आहेत, ज्यात गुजरात संघ 3 वेळा तर चेन्नई संघ 1 वेळा जिंकला आहे.
आयपीएल 2023 च्या हंगामात, गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. याच कारणामुळे या दोघांमध्ये क्वालिफायर-1 सामना होता.
चेन्नईची ताकद
चेन्नई सुपर किंग्जची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड. डेव्हन कॉनवेने 15 सामन्यांमध्ये 52.08 च्या सरासरीने आणि 137.06 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या आहेत. कॉनवेला ऋतुराज गायकवाड यांचीही चांगली साथ लाभली आहे. त्याने 15 सामन्यात 43.38 च्या सरासरीने आणि 146.87 च्या स्ट्राईक रेटने 564 धावा केल्या आहेत. यावेळीही अनेक नवे खेळाडू संघात दिसले.
गोलंदाजीत श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाने 11 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. स्लॉग ओव्हर्समध्ये मथिशाने शानदार गोलंदाजी केली. तो महेंद्रसिंग धोनीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. चेन्नईसाठी तुषार देशपांडेनेही 15 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत, जे सर्वाधिक आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने 15 सामन्यात 19 विकेट घेतल्या आणि 175 धावा केल्या. तिक्ष्णाने 12 सामन्यात 11 विकेट घेतल्या, तर दीपक चहरने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या. सुरुवातीला दीपक चहरची दुखापत आणि बेन स्टोक्सच्या दुखापतीमुळे चेन्नईचे गोलंदाजी कमकुवत मनाली जात होती. पण, धोनीच्या मार्गदर्शनाने नव्या गोलंदाजांनीच आपली ताकद दाखवली. महेंद्रसिंग धोनीही आज आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवू शकतो.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
गुजरातची ताकद
गुजरातसाठी मोहम्मद शमी (28 विकेट), राशिद खान (27 विकेट) आणि मोहित शर्मा (24 विकेट) हे गुजरातसाठी एक्स फॅक्टर ठरले आहेत. या तिघांनी मिळून 79 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत हे तिघेही धोनी अँड कंपनीचा खेळ खराब करू शकतात. राशिद खान त्याच्या गोलंदाजीने काय करू शकतो हे सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर धोनीला स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये 851 धावा करणाऱ्या शुभमन गिलविरुद्धही रणनीती बनवावी लागणार आहे.