Download App

PM मोदींवर केलेली टीका भोवणार, कोर्टाने दिले राहुल गांधींवर कारवाई करण्याचे आदेश

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात तर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा जोरदार समाचार घेतला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना कधी पनवती, तर कधी खिसेकापू हा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान, आता दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) यावर टिप्पणी करतांना राहुल गांधींनी पंतप्रधानांना ‘खिसेकापू’ म्हणणे योग्य नाही. हा शब्द त्यांच्या तोंडून येणे योग्य नाही असं सांगत निवडणूक आयोगाला ८ आठवड्यांच्या आत या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर मोठा निर्णय 

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करतांना खिसेकापू हा शब्द वापरला होता. त्यानंतर याचिकाकर्ते भरत नागर यांनी न्यायालयात याचिता दाखल केली होती. दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयात आज राहुल गांधींविरूद्ध कारवाई करण्यासाठी तसेच राजकीय नेत्यांकडून गैरवर्तन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींविषयी केलेली टीका बरोबर नसल्याचे प्रभारी सरन्यायाधीश मनमोहन यांनी सांगितले.

यावेळी न्यायाधीश मनमोहन यांनी निवडणूक आयोगाला राहुल गांधींची चौकशीचे आदेश दिले. शिवाय, राहुल गांधी यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. उत्तर दाखल करण्याची मुदत संपली असून कोणतेही उत्तर आलेले नाही, असे सांगत न्यायालयाने निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकसभेतून आणखी 3 खासदार निलंबित, आतापर्यंत 146 खासदारांवर कारवाई

याचिकाकर्ते भरत नागर यांनी न्यायालयात आपली बाजू मांडतांना सांगितले की, २२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर तसेच सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींवर घृणास्पद आरोप केले आणि त्यांना खिसेकापू म्हटलं होतं.

राहुल गांधींची नेमकी टीका काय?
राहुल गांधींनी राजस्थानमधील सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. त्यांनी मोदी, अमित शाह आणि गौतम अदानींची तुलना पाटिकमारांशी केली होती. ते म्हणाले होते की, पाकिटमार कधीही एकटा येत नाही. तीन येतात, एक समोरून, एक मागून आणि एक दूर अंतरावर उभा असतो. समोरचा पाकिटमार तुमचे लक्ष विचलित करतो. तुमचं लक्ष विचलित झाल्यावर मागच्या बाजूला असलेला पॉकिटमार तुमचे खिसे कापतो. तुमचे लक्ष दुसरीकडे भरकटवण्याचं काम मोहीत करतात. म्हणूनच ते पुढून येतात. ते तुमच्याशी टीव्हीवर संवाद साधतात. हिंदू-मुस्लिम, जीएसटी, नोटाबंदी, मला फाशी द्या असं काहीतरी बोलत असतात. तेवढ्यात मागून अदानी येऊन तुमचे पैसे घेऊन जातात. तिसरा व्यक्ती म्हणजे अमित शाह, जे घडले ते कोणालाच कळणार नाही याची ते काळजी घेतात, असं म्हणत राहुल गांधींनी टीका केली होती.

follow us