Download App

Delhi New Chief Minister 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण, 3 नावे चर्चेत, पाहा कोण?

Delhi New Chief Minister 2025 : भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होताना

  • Written By: Last Updated:

Delhi New Chief Minister 2025 : भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होताना दिसत आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, भाजपमध्ये (BJP) अनेक नेते आहेत ज्यांच्या नावांची चर्चा भाजप हायकमांड मुख्यमंत्री पदासाठी करू शकते.

तर दुसरीकडे मध्यप्रदेश (Madhya Pradesh) , हरियाणा (Haryana) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) भाजपने सर्वांना धक्का देत आऊट ऑफ द बॉक्स मुख्यमंत्र्यांची निवड केली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

प्रवेश वर्मा

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्या नावाची चर्चा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून होत आहे. प्रवेश वर्मा हे स्वतः दिल्लीतील पश्चिम दिल्ली मतदारसंघातून 10 वर्षांपासून खासदार आहेत आणि ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात आणि त्यांची जाट आणि गुर्जर समाजात चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीची कमान त्यांना मिळू शकते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नाला उत्तर देताना प्रवेश वर्मा म्हणाले, आमच्या पक्षात विधिमंडळ पक्ष (मुख्यमंत्रीपदाचा चेहरा) ठरवतो आणि नंतर पक्ष नेतृत्व त्याला मान्यता देते. त्यामुळे पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल.

वीरेंद्र सचदेवा

तर दुसरीकडे दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजप हायकमांड त्यांच्या नावाचा देखील विचार करू शकतो. मनोज तिवारी याच बरोबर दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांचेही नाव या शर्यतीत आहे.

केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?

मनोज तिवारी

हे सलग तीन वेळा दिल्लीतून खासदार राहिले आहेत आणि दिल्लीच्या राजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. तिवारी हे पूर्वांचलमधील एक लोकप्रिय चेहरा आहेत आणि पक्ष त्यांना दिल्लीबाहेरही पूर्वांचलमधील मतदारांमध्ये स्टार प्रचारक म्हणून उभे करत आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us