Download App

‘केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका…’; मालिवाल यांच्या कथित आरोपानंतर भाजप आक्रमक

स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या स्वीय सहाय्यकाने मारहाण केल्याचे वृत्त आहे.

Swati Maliwal : आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) राज्यसभा सदस्य स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या स्वीय सहाय्यकाने मारहाण केल्याचे वृत्त आहे. CM हाऊसमधून दिल्ली पोलिसांनी पीसीआर कॉल करण्यात आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. फोन करणाऱ्या महिलेने स्वत:ची ओळख स्वाती मालीवाल अशी सांगितल्याचं पोलिसांनी म्हणाले.

‘मी स्वाती मालीवाल बोलतेय, सीएम हाऊसमध्ये मला मारहाण…’; दिल्ली पोलिसांना कॉल, तपास सुरू 

दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कथित घटनेबाबत दोन कॉल आले होते. सकाळी ९.४० च्या सुमारास पहिला फोन आला. पहिल्या कॉलमध्ये फोन करणाऱ्या महिलेनं आपलं नाव उघड केलं नाही. पण पुन्हा एकदा 9.54 च्या सुमारास दुसरा कॉल आला. कॉलरने पोलिसांना सांगितले की, महिलेचे नाव स्वाती मालीवाल आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सहकारी विभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली.

लेखी तक्रार दाखल केली नाही दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आत गेले नाहीत. या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथे स्वाती आढळून आल्या नाहीत. प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलीस सीएम हाऊसमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. पोलीस पीसीआर कॉलची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याप्रकरणी अजून कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार देण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणी मालीवाल यांनी या प्रकरणी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

उद्धव ठाकरे मविआचे CM पदाचे उमेदवार? सूचक विधान करत म्हणाले, मी महाराष्ट्र… 

भाजपची केजरीवालांवर टीका
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे केवळ उघडपणे बेईमान नाहीत तर ते महिलांशी गैरवर्तन आणि गुंडगिरी करतात. आज राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या पीएने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. एवढा अभ्यास करून काय उपयोग? केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायलाही शिकला नाही, अशी टीका सिरसा यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी मालिवाल यांना झालेली मारहाण ही गंभीर बाब आहे. माजी महिला अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षित नाहीत, अशी टीका केली.

भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, केजरीवाल यांच्या सांगण्यावरून स्वाती मालीवाल यांना विभवने मारहाण केली. हे खरे असेल तर एवढं मोठं पाप देशातील कोणत्याही सीएम हाउसमध्ये यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असा मिश्रा म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज