Delhi Saket Court Firing : दिल्लीतील साकेत कोर्टात शुक्रवारी सकाळी अचानक एका महिलेवर एका पुरुषाने गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. हातात पिस्तुल घेऊन वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही महिला धावत राहिली आणि हल्लेखोर तिच्या मागे धावत असताना गोळीबार करत राहिला. यावेळी संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
दिल्लीच्या दक्षिणेकडील साकेत न्यायालय क्रमांक-3 बाहेर शुक्रवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने आरोपीकडून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते.
#WATCH दिल्ली: साकेत कोर्ट परिसर में फायरिंग की घटना में एक महिला गंभीर रूप से घायल हुई। महिला को गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया गया है।
(नोट: पुलिस द्वारा वीडियो की पुष्टि की गई है। वीडियो में अपशब्द का इस्तेमाल हुआ है।) pic.twitter.com/eNDSuLU6lo
— ANI_HindiNews (@AHindinews) April 21, 2023
डीसीपी दक्षिण चंदन चौधरी यांनी सांगितले की, हल्लेखोर वकील आहे. ते म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये आजच्या घटनेतील पीडिता आरोपी आहे. पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन महिलेने (शूटरकडून) पैसे घेतले होते, त्याच प्रकरणाबाबत दोघेही न्यायालयात आले होते. या महिलेवर फसवणुकीचे इतरही गुन्हे सुरू आहेत. हा माणूस येथे बराच काळ वकील होता आणि घटनेच्या वेळी तो त्याच्या गणवेशात होता.