Download App

Delhi Univrsity : हिंदुत्वाचा होणार इन डेप्थ अभ्यास; दिल्ली विद्यापीठाचा मोठा निर्णय, यावर्षीपासूनच अंमलबजावणी

Delhi Univrsity :  देशभरात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये होत असलेले बदल सध्या चर्चेत आहेत. अशातच आता दिल्ली विद्यापीठामध्ये हिंदुत्वावर अभ्यास सुरु करण्यात येणार आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र हिंदू अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

यात हिंदू धर्माच्या इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हिंदू धर्माची गतिशीलता, इतिहास, तत्त्वज्ञान आणि त्याची जागतिक प्रासंगिकता, मानवाच्या विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये हिंदू धर्माचे योगदान या विषयांवर अभ्यास होणार आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी या वृत्ताला दुजोरा दिला. या अधिकाऱ्याने सांगितले की, 9 जून रोजी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हिंदू अभ्यासाबाबत आवश्यक ठराव मंजूर करण्यात आला होता. हिंदू स्टडीजमधील पदव्युत्तर अभ्यास शैक्षणिक सत्र 2023-24 पासूनच सेंटर फॉर हिंदू स्टडीज अंतर्गत सुरू होईल.

Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; जम्मू-कश्मीरलाही जाणवले धक्के

या पैलूंवर जोर देण्याची योजना :

काही दिवसांपूर्वीच दिल्ली विद्यापीठाच्या साउथ दिल्ली कॅम्पसचे संचालक प्रकाश सिंह म्हणाले होते की, विद्यापीठात हिंदू स्टडीज सेंटरची गरज बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. आतापर्यंत 23 भारतीय विद्यापीठांमध्ये हिंदू अभ्यासाचे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. आता दिल्ली विद्यापीठानेही येथे हिंदू अभ्यासाचे केंद्र असावे, असा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे अजूनही बौद्ध अभ्यासाचे केंद्र आहे, परंतु हिंदू अभ्यासाचे केंद्र नाही.

हिच उणीव पूर्ण करण्यासाठी सेंटर फॉर हिंदू स्टडीज अंतर्गत विद्यार्थ्यांना हिंदू धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञान, हिंदू संप्रदाय, वेद, पुराणे आणि इतर पैलूंचा अभ्यास आणि संशोधन करण्यावर भर दिला जाईल. सध्या तरी पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्चचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येतो, असेही त्यांनी सांगितले होते.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

यापूर्वी शालेय अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आलेले अनेक बदल चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. यात सीबीएससी बोर्डाच्या पुस्तकांतून इस्लाम आणि मुघलांचा इतिहास वगळणे, लोकशाही या विषयाशी संबंधित पूर्ण धडा वगळणे, खलिस्तानबाबतचा धडा वगळणे, चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांत आणि ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा धडा वगळणे असे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय सावरकरांच्या जीवनाशी संबंधित प्रकरणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

Tags

follow us