Download App

‘धार्मिक स्थळांवर लष्कर तैनात करा अन्यथा..,’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील पाच धार्मिक स्थळांमध्ये लष्कर तैनात करा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, देशात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिरांची जबाबदारी मिलिटरीकडे देण्याी मागणी आंबेडकरांनी केली आहे. यावेळी बोलताना आंबेडकरांचा रोख कोणत्या पक्षाकडे होता? हे स्पष्ट झालं नाही.

कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी नॅशनल सेक्युरिटी गार्ड किंवा भारतीय सशस्त्र दलांना द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी देशात अशांतता निर्माण केली जाऊ शकते आणि त्यासाठी मंदिरांचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

INDIA : उमर अब्दुलांच्या फॉर्म्यूल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी? महाराष्ट्रासह, बिहारचं समीकरण बिघडणार…>

यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी मंदिरांची यादीच वाचून दाखवली असून वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर, मथुरेतील शाही ईदगाह, माता वैष्णो देवी मंदिर, कटरा, स्वामीनारायण अक्षरधाम, दिल्ली या धार्मिक स्थळांमध्ये लष्कर तैनात करण्याची मागणी आंबेडकरांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीने देखील ही भूमिका घेतली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, नेमकं कोणाला देशात धार्मिक वातावरण बिघडवायचं आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही.

Tags

follow us