कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज आपले उपोषण स्थगित केले आहे. गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासमोर सरकार झुकले आहे. जरांगे यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, ही मागणी जरांगे यांनी कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिवून जरांगेंनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. परंतु कुणबी प्रमाणपत्र आणि ९६ कुळी मराठा यावरून आता नवा वाद पेटू लागला आहे.
Ganesh Festival : मंडळांना गणपती पावला ! पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी, पण कोणत्या मंडळांचा समावेश?
जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात राणे हे मराठा आरक्षणावर बोलले. त्याचबरोबर राजकीय टीका करताना उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीवर नारायण राणे यांनी थेट आक्षेप घेतला आहे. राणे म्हणाले, राज्य सरकारने घटनेतील कलम 15-4 आणि 16-4 कलमाचा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागसलेल्या लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी सर्व्हेक्षण केले पाहिजे. सरसकट सर्वांना कुणबी दाखले देऊ नये. ९६ कुळी मराठ्यांची तशी मागणी नाही. मागासलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरयाsss’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार
नारायण राणेंच्या या आक्षेपाला जरांगे पाटील यांनी थेट प्रत्त्युतर दिले आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही आमची मागणी आहे. कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिक्षण, नोकरीसाठी कुणबी दाखला ज्याला काढायचा तो काढून घेईल. त्यामुळे गोरगरीब पोरांचे कल्याण होईल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हे प्रमाणपत्र घेतलेच पाहिजे, ही जबरदस्ती नाही. प्रमाणपत्र कोणी घरात आणून देणार नाहीय. तुम्ही गेलात तर ते देणार आहेत, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.