Download App

डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?

DK Shivakumar supports Siddaramaiah for the post of Chief Minister : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Assembly Elections) मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच खुद्द डी. के. शिवकुमार यांनी याबाबतचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात सीएमपदावरून संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे. अशातच डीके शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले डीके शिवकुमार?
सिद्धरामय्या यांच्याशी माझे मतभेद आहेत, असे काही लोक म्हणतात. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा आहे. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे, अशी शिवकुमार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच ऊत आला आहे. सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असल्याचेही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने भाजपचा धुळ चारत विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे.

त्याही पुढे, काँग्रेस 136 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारले. भाजपने 66 जागांवर निवडूण आली.

RR vs RCB : आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

दरम्यान, काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. अशातच मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला असल्याचं शिवकुमार यांनी सांगितलं. त्यामुळं आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होईल, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

 

Tags

follow us