RR vs RCB : आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

  • Written By: Published:
Wankhede_stadium

RR vs RCB : IPL 2023 च्या 60 व्या सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ 12 पैकी 6 सामने जिंकून 112 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 6 सामने गमावले आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स 11 सामन्यांत 5 विजय आणि 6 पराभवांसह 10 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू घरच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करतील.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (c/wk), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा परवानगीशिवाय गैरवापर, अज्ञातांविरुध्द FIR दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube