Download App

आर अशोक यांचा पराभव करून DK Shivakumar सुमारे एक लाख मतांनी विजयी

DK Shivakumar won by 1 lakh : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा (BJP) दारूण पराभव झाला आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. कनकापुरा विधानसभा मतदारसंघात (Kanakapura Assembly Constituency) महसूल मंत्री आर अशोक (R Ashok) यांचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी त्यांचा पराभव केला. शिवकुमार हे तब्बल एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.

या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत डीके शिवकुमार आणि राज्याचे महसूल मंत्री आर अशोक हे कनकपुरा मतदारसंघातून आमनेसामने आहेत. 2008 पासून हा काँग्रेस नेत्यांचा बालेकिल्ला आहे. डीके शिवकुमार यांना या मतदार संघात पराभूत करण्यासाठी भाजपने पराकोटीचे प्रयत्न केले. याच प्रयत्नाचा भाग म्हणून शिवकुमार यांना हरवण्यासाठी वोक्कलिगा समाजाचा चेहरा असलेले भाजप नेते आर अशोक यांना पद्मनाभनगर मतदारसंघाऐवजी कनकपुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.
या निवडणुकीत डीके शिवकुमार यांना 143023 इतके मते पडली. तर आर अशोक यांना 19753 इतकी मते पडली आहेत.

शिवकुमार यांनी या निवडणुकीत त्यांनी आर. अशोक यांचा सुमारे 1 लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशीच त्यांनी मतदारसंघात प्रचार केला होता.

Dharmaveer: आनंद दिघे यांच्या जीवनपटाला एक वर्ष पूर्ण! ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकची खास पोस्ट

डीके शिवकुमार यांना वोक्कलिगा समाजाचा कर्नाटकात मोठा पाठिंबा आहे. डीके शिवकुमार हे विद्यार्थी जीवनापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. 1980 पासून डीके काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. 1989 मध्ये डीकेंनी सथनूर विधानसभेतून थेट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी आताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सथनूरमधून दारुण पराभव केला होता. 2013 मध्ये कनकपुरातून पीजीआर सिंधिया या दिग्गज नेत्यालाही त्यांनी धूळ चारली होती. तर 2023 च्या या विधानसभा निवडणुकीत आर अशोक यांना धोबीपछाड केलं.

डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. त्यांना राजकारणात ‘कनकपूरचा अभेद्य दगड’ म्हणूनही ओळखले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके हे नेहमीच हायकमांडच्या संपर्कात असतात. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला तुरुंगातही जावे लागले.

शिवकुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे जाहीर केली होती. एक्झिट पोलमध्ये देखील डीके शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. त्यामुळं आता कर्नाटकचे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us