Download App

जम्मू काश्मिरमध्ये पावसाचा हाहा:कार : अमरनाथ यात्रा स्थगित, 60 हजार यात्रेकरु अडकले

Amarnath Yatra 2023: गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार उडवला आहे. या पावसामुळे अमरनाथ यात्रेसाठी गेलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रेला गेलेले सुमारे 50,000 यात्रेकरू पहलगाममध्ये अडकले आहेत. याशिवाय रामबनमध्ये सुमारे 6,000 यात्रेकरू अडकले आहेत. याशिवाय इतरही काही ठिकाणी भाविक अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Due to heavy rain both in Jammu division and Kashmir, authorities decided to suspend the Amarnath Yatra for the third day running on Sunday)

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे उधमपूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहारमधील अडकलेल्या यात्रेकरुंना स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीवरुन समजले की 1985 नंतर आता पहिल्यांदाच पावसामुळे अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शुक्रवार आणि शनिवारीही खराब हवामानामुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती.

Maharashtra Rain : कोकणात पावसाची संततधार! राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस…

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, “मी वैयक्तिकरित्या आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अमरनाथ श्राइन बोर्डचे सीईओ डॉ. मनदीप भंडारी यांच्याशी बोललो आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे शुक्रवारी आणि (7 जुलै) यात्राही स्थगित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने अनंतनाग जिल्ह्यातील 48 किमी लांब पारंपरिक पहलगाम मार्गावरील यात्रा आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमी लांबीच्या बालटाल मार्गावरील यात्रा स्थगित करण्यात आली होती.

काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’; PM मोदींचं राहुल गांधींवर टीकास्त्र

दक्षिण काश्मीर हिमालयातील 3 हजार 888 मीटर उंचीवर असलेल्या 62 दिवसांची अमरनाथ यात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू झाली आणि 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे. आतापर्यंत 80 हजारहून अधिक यात्रेकरूंनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे.

नायब राज्यपाल परिस्थितीवर लक्ष ठेवून :

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्व व्यवस्था सुरू आहे. यात्रेचा दररोज दोनदा आढावा घेतला जात आहे.  मला आशा आहे की उद्यापासून हवामानात सुधारणा होईल आणि यात्रा पुन्हा सुरू होईल.

Tags

follow us