Maharashtra Rain : कोकणात पावसाची संततधार! राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस…

Maharashtra Rain : कोकणात पावसाची संततधार! राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस…

Maharashtra Rain : मान्सून दाखल झाल्यापासून कोकण भागांत चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागांत अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. काही भागांत मुबलक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्यांची कामे रखडली आहेत. पुढील 4 ते पाच दिवस कोकणात पावसाची संततधार बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.

पवारांचं मोदींना चॅलेंज; असेल नसेल तेवढी सत्ता वापरा भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झालं तर पाहिजे ती शिक्षा द्या

राज्यातील कोकण विभागांत मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे नवी मुंबई, भागांतही पाऊसाची संततधार सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असून राज्यातील इतर भागांत अद्यापही पावसाची प्रतिक्षाच आहे.

मागील महिन्यात राज्यातील काही भागांत पावसाची प्रतिक्षा होती अखेर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झालीय. मराठवाड्यातल्या 67 मंडळांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलीय.

‘मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही’; दौरा सुरू होण्याआधीच पवारांनी अजितदादांना डिवचलं!

अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली असून 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात समाधनकार पाऊस पडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची रखडलेल्या कामांना आता वेग आला आहे.

Ajit Pawar Press : राष्ट्रवादीच्या घटनेवर बोट ठेवत पटेलांनी पवारांसह जयंतरावांना घेरलं!

नंदुरबार जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला असून शेतकऱ्यांच्या पेरण्या आता सुरु झाल्या आहेत. आत्तापर्यंत 30 टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची कामे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून जिल्ह्यात शेतकरी कापूस आणि भात लागवड करतात दिसून येत आहेत.

दरम्यान, कोल्हापूरात झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील धरण तुडूंब भरल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, आणि शिरोळ हे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube