Ajit Pawar Press : राष्ट्रवादीच्या घटनेवर बोट ठेवत पटेलांनी पवारांसह जयंतरावांना घेरलं!

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 07T174807.369

Ajit Pawar Press Conference :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घतेली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. 30 जून रोजी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडले. यावेळी सर्वानुमते अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले व अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून निवडण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. यावेळी पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेचा दाखल देत शरद पवार व जयंत पाटील यांना घेरले.

30 जूनला राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यामध्ये अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा खळबळजनक खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला. यानंतर अजित पवार यांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.  30 जूनपासूनच्या घडामोडी निवडणूक आयोगाकडे आहेत, असंही पटेल यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या  नाव आणि चिन्हाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. नव्या नियुक्त्यांबद्दल निवडणूक आयोगला आम्ही अर्ज केला आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीची बैठक अधिकृत नाही, असे सांगताना त्यांनी शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील काही मुद्दे वाचून दाखवले.

शरद पवारांच्या वयावरून ‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा टोला

पटेल म्हणाले की,  “पक्षाचं बहुमत अजितदादांच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही. जयंत पाटील हे पक्षाच्या संविधानानुसार प्रदेशाध्यक्ष नाही. एकाही आमदाराला अपात्रतेची कारवाई लागू होत नाही. राष्ट्रवादीत अनेक वर्ष निवडणूका झालेल्या नाही. त्यामुळे त्यांना आम्हाला निलंबन करण्याचा कोणताही अधिकार नाही. 2022 मध्ये झालेल्या अधिवेशनाला अधिवेशन म्हणता येणार नाही. कारण संविधानानुसार निवडणुका घेणं आवश्यक होतं. मात्र आमच्या पक्षात गेली अनेक वर्षे निवडणूकच झाली नाही. पक्षबांधणी करताना राष्ट्रवादीच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. जयंत पाटील यांनी आमच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. मात्र ते आमचे प्रदेशाध्यक्ष नाहीत. कारण त्यांची नेमणूक अधिकृत नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.”

मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

तसेच, आम्हाला कोणीही  काढू शकत नाही. हा सर्व अधिकार निवडणूक आयोगाचा आहे व त्यानंतर विधानसभा अध्यक्ष याविषयीचा निर्णय घेतील. तोपर्यंत कुणालाही निलंबन करता येणार नाही. आमच्याकडे बहुमत असल्याने आम्ही निर्णय घेत आहोत. आम्ही पण अभ्यास केला आहे. आम्ही देखील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे आमच्या आमदारांना कोणतीही अडचण येणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

 

 

follow us