शरद पवारांच्या वयावरून ‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा टोला

शरद पवारांच्या वयावरून ‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis on Sharad Pawar : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीसाठी विरोधी पक्ष महत्वाचा असून लक्ष विचलित असलेला विरोधी पक्ष असणे ठीक नाही. अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितल्याप्रमाणे ते सभा घेतील. आमच्या सभानांही 30 ते 40 हजार लोक येत असतात. शरद पवार यांना 100 वर्षे आयुष्य लाभावे असे आम्हाला वाटते.

राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

परंतु, सहानुभूती मिळविण्यासाठी काही कार्यकर्ते त्यांच्या वयाचा दाखला देत आहेत पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाहीत असे फडणवीस यांनी सध्या शरद पवारांच्या  वयाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला उत्तर दिले. सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही तीन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील पक्ष प्रवेशावेळी तु्म्ही इथे कसे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजप ही एक भावनिक युती आहे. नीलम ताई आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणूनच मी त्यांच्या पक्षप्रवेशावेळ येथे उपस्थित आहे. त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून हिंदुत्वाला पुढे नेत असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube