राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

राष्ट्रवादी काँग्रेस भवन आमचंच आहे, स्वत:हुन ताब्यात द्या, नाहीतर थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालय उभारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे. सध्या पुण्यातल्या राष्ट्रवादी भवनाचा ताबा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे आहे.त्यामुळे आता पुणे राष्ट्रवादीत कार्यालयाच्या मुद्द्यावरुन नवा वाद पेटणार असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

सध्या पुण्यातल्या राष्ट्रवादी भवनाचा ताबा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप असून जगतापांकडे राष्ट्रवादीचा भवनाचा ताबा आहे. प्रशांत जगताप यांनी स्वत: आम्हाला राष्ट्रवादी भवनाचा ताबा द्यावा, अशी मागणी दीपक मानकरांनी केली आहे.

नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी! महसूलमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना…

राष्ट्रवादी भवनाचा करार हा प्रशांत जगताप यांच्या नावे आहे. पक्षाचं कार्यालय जगतापांच्या नावावर असल्याने त्यांनी पक्षाची फसवणूक केल्याचा आरोपही दीपक मानकर यांनी केला आहे. दरम्यान, कार्यालय न दिल्यास थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालया उभारणार असल्याचा इशाराच दीपक मानकरांनी प्रशांत जगताप यांना दिला आहे.

Tamim Iqbal : भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या ‘तमीम’ च्या आठवणीत राहणाऱ्या इनिंग्स्…

यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादीत काम करीत आहोत. आज अजितदादांनी माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. दादांनी दिलेल्या संधीचं सोन करुन दाखवणार आहे. पुण्यात सर्वच घटकातील लोकांना पक्षात सामावून घेत संघटना वाढवून मजबूत करण्याचं काम आमचं असणार आहे. येत्या काही दिवसांत आमच्या गटात इतरही काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे तर आहेतच दुसऱ्या पक्षांचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं यावेळी दीपक मानकरांनी सांगितलं आहे.

‘पवार विरुद्ध पवार’ खेळात अजितदादा सध्या तरी वरचढ!

तसेच राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय हे पक्षाचं आहे. ते आमचच आहे त्यासाठी कोणतीही विनंती करणार नाही. या कार्यालयाचा करार हा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून नाहीतर वैयक्तिक स्वत:च्या नावावर करुन पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप मानकरांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी आम्ही त्यांचा फोटो वापरणार असून शरद पवारांनी आता अजितदादांना आशिर्वाद द्यावेत, तसेच दादांनी काय 83 व्या वर्षी मुख्यमंत्री व्हावं का? असा उपरोधिक सवाल उपस्थित करीत त्यांनी शरद पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं आहेय.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्याने राजकीय गोंधळच उडाल्याची परिस्थिती महाराष्ट्रात दिसू लागलीय. दोन्ही गटाने कार्यकारिणी जाहीर केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही पक्षाच्या कार्यालयावरुन दोन गट भिडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुण्यातही पक्षाच्या कार्यालयावरुन वादंग होण्याची चिन्हे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube