काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’; PM मोदींचं राहुल गांधींवर टीकास्त्र

काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’; PM मोदींचं राहुल गांधींवर टीकास्त्र

PM Narendra Modi : काँग्रेस (Congress) म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मोहब्बत की दुकान खोलने आया हुँ, या संकल्पनेला प्रत्युत्तर दिलं. राजस्थानधील बिकानेर इथं आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. (PM Narendra Modi criticism Congress leader Rahul Gandhi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने कायमच द्वेष पसरवण्याचं काम केलं, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा केली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारत जोडो काढला होती. त्यावेळी त्यांनी मोहब्बत की दुकान खोलने आया हू, असं वारंवार म्हटलं होतं. मै नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान खोलने आया हू, या टीकेला आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

पंतप्रधान मोदी म्हणाले, राजस्थानचे शेतकरी काँग्रेस सरकारला कंटाळले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून त्यांनी शेतकरी वर्गासाठी काय केले? गेल्या 4 वर्षात काँग्रेस पक्षात केवळ अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. सगळेजण एकमेकांचे पाय ओढत आहेत. कॉंग्रेस सरकारने या चार वर्षात शेतकरी वर्गांच खूप नुकसान केलं. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण, आज ४ वर्ष झाले तरी कर्जमाफी मिळाली नाही.

केंद्राने राजस्थानसाठी अनेक योजनांचे पैसे पाठवले. पण काँग्रेसने त्यांची अंमलबजावणी न करता त्या पैशावर डल्ला मारला. राजस्थानच्या समस्यांकडे काँग्रेसने कधीच लक्ष दिले नाही. काँग्रेसचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ की बाजार’. काँग्रेस राज्याला पोकळ बनवत आहे. काँग्रेस नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. त्यांनी शैक्षणिक संस्थानाही सोडले नाही. महिलांवरील अत्याचारातही कॉंग्रेस आघाडीवर आहे. येथे रक्षकच शिकारी होत आहे, अशीही टीका पंतप्रधान मोदी यांनी केली

काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत पावसाचा कहर; भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा स्थगित 

दरम्यान, गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. यामध्ये ‘नफत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ’ अशा शब्दांत ते सतत भापजवर टीका करत होते. यानंतर कर्नाटक निवडणूकीच्या निकालानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रचारावर थेट हल्ला करत नफरत का बाजार बंद हो गया, अब मोहब्बत की दुकान खुल गई है, अशा शब्दात भाजपला डिवचलं होतं. त्यानंतर राहुल गांधींकडून ‘मोहब्बत की दुकान’ हे कॅम्पेन सातत्याने चालवले जात होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube