Download App

राजधानी दिल्लीत जोरदार भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.6 तीव्रतेची नोंद; नागरिकांमध्ये घबराहट

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आज (दि.6) जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले असून, गेल्या तीन दिवसांत दिल्लीत दुसऱ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. (Delhi Earthquake) दुपारी 4 वाजून 18  मिनिटांनी हे धक्के जाणवले असून, रिश्टर स्केलवर 5.6 एवढी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. या जोदार भुंकपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज जाणवलेल्या भूकंपात जीवित आणि वित्त हानी किती झाली आहे याबाबत अद्यापर्यंत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. ( 5.6 Richter scale Earthquake Measured In Delhi NCR)

तीन दिवसांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ (Nepal) होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले. शुक्रवारी झालेल्या या भूकंपात 157 जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 22 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. त्या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला.

दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पाटणा येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मात्र भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. 2015 मध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता.

या काळात सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला. केंब्रिज विद्यापीठातील टेक्टोनिक तज्ज्ञ जेम्स जॅक्सन यांनी दिलेल्यामाहितीनुसार की, भूकंपानंतर काठमांडूची जमीन तीन मीटर म्हणजेच सुमारे 10 फूट दक्षिणेकडे खचली. मात्र, जगातील सर्वात मोठे पर्वतशिखर असलेल्या एव्हरेस्टमध्ये बदल होण्याची चिन्हे नाहीत. नेपाळमधील हा भूकंप 20 मोठ्या अणुबॉम्ब इतका शक्तिशाली होता.

दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू, शाळांनाही सुट्टी, प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय

पृथ्वीचा पृष्ठभाग प्रामुख्याने 7 मोठ्या आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्सपासून बनला असतो. या प्लेट्स कायम तरंगत राहतात आणि कधीकधी एकमेकांवर आदळत असतात. अनेकदा धडक झाल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब पडल्यास या प्लेट्स तुटू लागत असतात. अशा स्थितीत जमिनीतील उर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात भूकंप होतो.

Tags

follow us