Rajasthan Earthquake : राजस्थानमधील सिरोही (Sirohi) जिल्ह्यातील रेवदार (Revdar) येथे गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला आणि रेवदार आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमीन हादरू लागली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र अद्याप प्रशासनाकडून भूकंपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू याबद्दल माहिती गोळा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर जमीन हादरल्यासारखी वाटली. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. तर दुसरीकडे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राजस्थान में आया भूकंप, सिरोही-जालोर में हिली धरती. 3-4 सेकेंड तक महसूस हुए झटके; घरों-दुकानों से निकलकर भागे लोग.#earthquake #Rajasthan
— Balmukund Joshi (@balmukundjoshi) February 13, 2025
चार दिवसांनंतर बदलणार फास्टॅगचे नियम, जाणून घ्या सर्वकाही नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल