चार दिवसांनंतर बदलणार फास्टॅगचे नियम; नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल

  • Written By: Published:
Fastag Rule Change

Fastag Rule Change : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय 17 फेब्रुवारीपासून FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू करणार आहे. ज्यामुळे आता यूजर्सला त्याच्या FASTag स्थितीबाबत अधिक अक्टिव्ह राहण्याची आवश्यकता आहे नाहीतर तुमचा FASTag पेमेंट अडकू शकते.

FASTag चे नवीन नियम

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 28 जानेवारी 2025 रोजी एक नवीन नियम लागु केला होता. या नियमानुसार, 17 फेब्रुवारी 2025 पासून जर टोल प्लाझावर टॅग रीड करण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला तर किंवा रीड केल्यानंतर किमान 10 मिनिटांसाठी टॅग ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास पैसे दिले जाणार नाही. या नवीन नियमामुळे यूजर्सला त्यांचा FASTag स्थिती दुरुस्त करण्यासाठी 70 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.

बदलाचा यूजर्सवर कसा होणार परिणाम

नवीन नियमांचा थेट यूजर्सवर परिणाम होणार आहे. नवीन नियमांमुळे आता टोल नाक्यावर ब्लॅकलिस्टेड FASTag चा शेवटच्या क्षणी रिचार्ज केल्याने तुमचे नुकसान होणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही टोलवर पोहोचता तेव्हा तुमचा फास्टॅग आधीच ब्लॅकलिस्ट केलेला असेल तर लगेच रिचार्ज केल्याने पैसे मिळणार नाहीत.

तुम्ही ते असे समजू शकता

जर तुमचा FASTag टोलवर पोहोचण्यापूर्वीच ब्लॅकलिस्ट केला गेला आणि टॅग रीडनंतरही ब्लॅकलिस्टमध्ये राहिला तर पेमेंट होणार नाही आणि तुमच्याकडून दुप्पट टोल आकारला जाईल.

जर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असेल परंतु जर तुम्ही टॅग रीडपासून 60 मिनिटांच्या आत किंवा रीडपासून 10 मिनिटांच्या आत रिचार्ज केला तर तुमचे पेमेंट मिळेल आणि तुमच्याकडून सामान्य रक्कम आकारली जाईल.

ब्लॅकलिस्टची स्थिती कशी तपासायची

परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

“Check E-Challan Status” पर्याय निवडा.

तुमचा वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.

अशा प्रकारे तुम्हाला कळेल की तुमचे वाहन ब्लॅक लिस्ट आहे की नाही.

FASTag कसे अनब्लॉक करायचे

सर्वप्रथम फास्टॅग रिचार्ज करा.

यानंतर किमान शिल्लक ठेवा.

नंतर पेमेंटची पडताळणी करा.

अयुष्मान खुराना WPL 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज

यानंतर फास्टॅगची स्थिती कळेल.

काही वेळातच फास्टॅग अक्टिव्ह होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube