ED Raid on AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपात वाद वाढत चाललेला असतानाच यात आणखी वाढ होईल अशी घटना घडली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह (ED Raid on AAP MP Sanjay Singh) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथकाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरी शोधमोहिम राबवत आहे. सिंह यांच्या घरी याआधीही ईडीने छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी ईडीचे पथक धडकल्याने खळबळ उडाली आहे.
न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात वेबसाइटच्या संस्थापकला अटक, 46 जणांची चौकशी
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एएनआयने वृत्त दिले आहे, की दिल्ली मद्य धोरण (ED Raid) प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. मात्र, यावर खासदार संजय सिंह (Sanjay Singh) आणि आम आदमी पार्टी यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले गेलेले नाही. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) जेलमध्ये आहेत. आम आदमी पार्टीने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. नेत्यांना विनाकारण यामध्ये अडकवले जात असल्याचा आरोपही पार्टीकडून सातत्याने केला जातो. विशेष म्हणजे, तपास यंत्रणांना या प्रकरणात अद्याप कोणतेच ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
#WATCH | Visuals from outside AAP Rajya Sabha MP Sanjay Singh's residence
ED raids underway at the residence of AAP Rajya Sabha MP Sanjay Singh pic.twitter.com/k6FRDjY12S
— ANI (@ANI) October 4, 2023
अशा परिस्थितीत आता ईडीचे पथक खासदार संजय सिंह यांच्या घरी दाखल झाले असून शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून ईडीच्या हाती काही लागते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसे पाहिले तर खासदार संजय सिंह सातत्याने ईडी आणि सीबीआयवर टीका करत. सरकारकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने या तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचाही आरोप त्यांच्याकडून केला जात होता. त्यानंतर आता त्यांच्या घरी कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईवर आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या देशभरातील ईडीच्या कारवाया पाहता या कारवाईलाही महत्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणात आता आम आदमी पार्टीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Delhi Earthquake: दिल्ली NCR भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले! नागरिकांची पळापळ