Download App

‘आप’ला अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंडमधून कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर निधी, ईडीचा गृहमंत्रालयाला अहवाल

ED Submitted Report AAP Case : आज देशातील 48 लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या पाचव्या टप्यासाठी मतदान पार पडले आहे. तर दुसरीकडे ऐन

Image Credit: letsupp

ED Submitted Report AAP Case : आज देशातील 48 लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्यासाठी मतदान पार पडले आहे. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या काळात आम आदमी पक्षाच्या (AAP) अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाला अंमलबजावणी संचालनालयाने एक अहवाल सादर केला आहे.

या अहवालानुसार, आम आदमी पक्षाला 2014  ते 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात परदेशी निधी मिळाला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार, 2022 ते 2024 दरम्यान, आम आदमी पक्षाला अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, यूएई, कुवेत आणि ओमानमधून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. 2022 ते 2024 दरम्यान पक्षाला 7.08 कोटी रुपयांचा निधी मिळाला अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

यामुळे पक्षाने FCRA, RPA आणि IPC चे उल्लंघन केले असून देणगी देणाऱ्यांची ओळख पक्षाने लपवली, त्यांच्याशी छेडछाड करत खोटी ओळख दिला असा आरोप या अहवालात ईडीकडून करण्यात आला आहे.

तर आता या प्रकरणात आम आदमी पार्टीकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि दिल्ली सरकारमध्ये मंत्री असणारी आतिशीने भाजपवर टीका करत म्हणाली, दारू घोटाळा आणि स्वाती मालीवाल प्रकरणाच्या अपयशानंतर आता भाजपने हे नवीन प्रकरण समोर आणले आहे. उद्या आणखी असेच काही आरोप करण्यात येईल. यावरून हे लक्षात येत आहे की, भाजप या लोकसभा निवडणुकीत पंजाब आणि दिल्लीमधील सर्व 20जागांवर पराभव होत आहे. आता खोटे आरोप चालणार नाही.

लोक नरेंद्र मोदींवर नाराज आहे आणि ही कारवाई ईडीची नसून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. हे अनेक वर्ष जुने प्रकरण आहे. आम्ही या प्रकरणात ईडी, सीबीआय, गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाला सर्व उत्तरे दिली आहे.

Google Pay 4 जूनपासून बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय

त्यामुळे भाजपकडून आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा डाव आहे, भाजप प्रत्येक निवडणुकीपूर्वी हे सर्व करते. असे अनेक खोटे आरोप येत्या चार दिवसांत केले जातील. मोदीजी केजरीवाल यांना घाबरतात असं देखील आतिशी म्हणाली.

follow us

वेब स्टोरीज