हॉकीतही ऑस्ट्रेलिया बलाढ्य! पहिल्याच सामन्यात गोलवर्षाव करत केला भारताचा पराभव
Hockey Test Match IND vs AUS : क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तर बलाढ्य आहेच पण ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघही दमदार कामगिरी करत आहे. याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोल वर्षाव करत भारताचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 असा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडू टॉम विकहॅम, टीम ब्रँड, फ्लिन ऑलवी, ज्योएल रितांल यांनी गोल केले. भारतही प्रत्युत्तरात गोल करील अशी अपेक्षा होती. परंतु, ऑस्ट्रेलियाने तशी संधी भारताला दिली नाही. गुरजंत सिंगने भारतासाठी एकमेव गोल केला.
Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी ठरला ग्रँड स्लॅम चॅम्पियन
या सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळ केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन मिनिटातच पहिला गोल करण्यात आला. टीम ब्रँडने हा गोल केला. एका मिनिटाभरात ऑस्ट्रेलियाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी भारताच्या श्रीजेश गोल वाचवला. पहिल्या पेनल्टी कॉर्नरवेळी सुद्धा श्रीजेशचा बचाव अभेद्य ठरला. यानंतर सामन्याच्या दहाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु, संघाला त्याचा उपयोग झाला नाही.
यानंतर ऑस्ट्रेलियाने अधिक आक्रमकता दाखवली. काही वेळातच दुसरा गोल केला. यावेळी भारताचे खराब क्षेत्ररक्षण दिसून आले. सामन्याच्या मध्यंतरानंतरही ऑस्ट्रेलियाचे आक्रमक धोरण कायम राहिले. भारताकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले. ऑस्ट्रेलियन गोलकीपर अँड्र्यू चार्टर्डने गोल होऊ दिले नाही.
विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने जिंकला पहिला हॉकी वर्ल्डकप; भारताचा पराभव
यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावेळीही भारताच्या श्रीजेशने चांगले क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर भारताने आक्रमकपणा दाखवत एक गोल केला. हा गोल मात्र एकमेव ठरला. यानंतर भारतीय संघाला आणखी गोल करता आले नाहीत. आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश मिळवले. या सामन्यातील यशानंतर ऑस्ट्रेलियाे आघाडी घेतली आहे.