Arvind Kejriwal : राजधानी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात चौकशीसाठी ईडीने आज चौथ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बोलावले होते. मात्र, केजरीवाल याही वेळेस हजर राहिले नाहीत. त्यांनी त्यांचे उत्तर केंद्रीय एजन्सीला पाठवले आहे, असे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार (Lok Sabha Election 2024) करता येऊ नये यासाठी अटक करण्याचा उद्देश यामागे आहे. राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून हे केलं जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
दिल्लीतील दारू घोटाळ्यात चौकशीसाठी ईडीने अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज त्यांना चौकीसाठी जायचे होते. मात्र केजरीवाल चौकशीसाठी गेलेच नाही. केंद्रीय एजन्सीला पत्र पाठवून उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. मला ज्या चार नोटीसा बजावण्यात आल्या होत्या त्या कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. ईडीने ज्या ज्या वेळी अशा नोटीस पाठवल्या त्यावेळी न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या आहेत. या नोटीस बेकायदेशीर कशा आहेत हे मी अनेक वेळी ईडीला सांगितले आहे मात्र त्यांच्याकडून काहीच उत्तर मला मिळाले नाही.
Arvind Kejriwal : चौकशीला दांडी, केजरीवाल गाठणार ‘एमपी’ ‘आप’च्या खेळीने ‘ईडी’ही गोंधळात
या प्रकरणाचा तपास मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र ईडीला अजूनही काहीच हाती लागलेले नाही. न्यायालायनेही यांना अनेक वेळा विचारले आहे की आतापर्यंत किती रिकव्हरी झाली. सोने किंवा जमिनीचे कागदपत्र मिळाले. मात्र काहीच मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. लोकांना मारहाण करून त्यांच्याकडून खोटे जबाब नोंदवून घेतले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी अचानक नोटीस देऊन मला का बोलावले जाते. अरविंद केजरीवाल यांनी अटक करणार असे भाजपवाले सगळीकडे फिरून सांगत आहेत. मला अटक केली जाणार हे या लोकांना कसं कळतं याचाच अर्थ ईडीला भाजपाच चालवत आहे हे आता स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मी प्रचारच करू नये असेच या लोकांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीआधी केजरीवालला अटक करा आणि निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखा हाच या सगळ्या नाट्यामागचा उद्देश आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
केजरीवालांच्या अडचणीत वाढ, औषध घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश