Download App

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गात 45 विद्यार्थी; शाळांसाठी ‘या’ अटी

फक्त विशेष परिस्थितीतच पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात 45 विद्यार्थ्यांना दाखल करून घेता येईल.

CBSE New Decision : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने शाळांची मागणी (CBSE New Decision) विचारात घेऊन एक मोठा निर्णय घेतला आहे. फक्त विशेष परिस्थितीतच पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात 45 विद्यार्थ्यांना दाखल करून घेता येईल. अन्यवेळी मात्र ही संख्या 40 इतकी मर्यादीत राहील. देशातील बोर्डाच्या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे एका वर्गात जास्त मुलांना बसवावे लागत आहे. शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता बोर्डाचा हा निर्णय या शाळांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.

विशेष आणि अत्यंत आवश्यक परिस्थितीतच ही सूट देण्यात येईल असे सीबीएसईने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची दुसऱ्या शहरात बदली होणे, Essential Repeat कॅटेगरीत येणारे विद्यार्थी जे काही कारणास्तव एकाच वर्गात दुसऱ्यांदा शिक्षण घेत आहेत. गंभीर आजाराने पीडित विद्यार्थी, होस्टेल सोडून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानांतरणाची प्रकरणे तसेच आपली कामगिरी सुधारण्यासाठी पुन्हा त्याच इयत्तेत शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, अशा काही प्रकरणात सूट दिली जाऊ शकते.

मोठा निर्णय! CBSE शाळांत आता CCTV कॅमेऱ्यांचा वॉच; 15 दिवसांचे रेकॉर्डिंग बंधनकारक

शाळांना काय करावं लागणार

सीबीएसईने सूचना दिल्या आहेत की जर 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असेल तर त्यांची सर्व माहिती रेकॉर्डमध्ये नोंदवणे बंधनकारक राहील. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गात जास्तीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असेल तर तो का दिला जात आहे याची कारणे सीबीएसई पोर्टलवर नमूद करावी लागणार आहेत. तसेच अॅडमिशन/विदड्रॉल रजिस्टरमध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गासाठी प्रवेशाचे कारण फक्त रजिस्टर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. OASIS पोर्टलवरही सर्व माहिती अपलोड करणे गरजेचे राहणार आहे.

बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीत एका वर्गात 45 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दाखला देता येणार नाही. यासाठी काही निकष तयार करण्यात आले आहेत. यामध्ये वर्गाचा आकार कमीत कमी 500 वर्ग फूट असावा. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कमीत कमी एक वर्ग मीटर निर्मित क्षेत्र असले पाहिजे. हा नियम सीबीएसई एफिलिएशन बायलॉज 2018 चे कलम 4.8 अंतर्गत लागू करण्यात आले आहे.

ब्रेकिंग ! आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

follow us