Download App

Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ नावांनीही भारताची ओळख; जाणून घ्या, इतिहास

Bharat : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे या नावांमागचा इतिहास काय हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

प्राचीन काळाचा विचार केला तर आपल्या देशाला अनेक नावे होती. प्राचीन ग्रंथांत वेगवेगळी नावे सापडतात. ‘जम्बूद्वीप’, ‘भारतखंड’, ‘हिमवर्ष’, ‘अजनाभ वर्ष’, ‘आर्यावर्त’ अशी नावे दिसतात. तर काही इतिहासकारांनी ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘भारतवर्ष’, ‘इंडिया’ अशी नावे या देशाला दिली. मात्र या सगळ्यात ‘भारत’ (Bharat) हेच नाव प्रत्येकाच्या तोंडी राहिले. काही स्त्रोतांकडून असेही कळते की विष्णू पुराणातही याचा उल्लेख केला आहे. समुद्राच्या उत्तरेपासून ते हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत भारताच्या सीमा आहेत.

‘बिग बीं’चं ‘भारत माता की जय’; नेटकऱ्यांनी शोधलं ‘इंडिया’चं कनेक्शन!

पौराणिक मान्यतांचा विचार केला तर भरत (Bharat) नावाच्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. ज्यांच्या नावांवरून या देशाला भारत या नावाने ओळखले जाते. एक मान्यता अशीही आहे की हस्तिनापूरचे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत याच्या नावाने या देशाचे नाव भारत पडले. तर दुसरीकडे असेही सांगितले जाते की भरत नावाचे सम्राट होऊन गेले. त्यांच्या नावावरून या देशाचे नाव भारतवर्ष असे पडले. संस्कृत भाषेत ‘वर्ष’ या शब्दाचा अर्थ परिसर किंवा भाग असा होतो. सगळ्यात प्रचलित मान्यता अशी आहे की भगवान श्रीराम यांचे छोटे बंधू भरत यांच्या नावाने या देशाला भारत नावाने ओळखले जाऊ लागले.

इंडिया नाव कसं मिळालं?

इंग्रज ज्यावेळी आपल्या देशात आले त्यावेळी त्यांनी सिंधू घाटीला इंडस व्हॅली असे संबोधले. याच आधारावर या देशाला इंडिया नाव दिले गेले. इंडिया म्हणणे सोपे देखील होते. त्यावेळपासूनच भारताला (Bharat) इंडिया म्हटले जाऊ लागले.

इंडिया शब्द काढण्याची मागणी कशासाठी?

भारतीय संविधानातील अनुच्छेद 1 मध्ये ‘इंडिया दॅट इज भारत’ (Bharat) म्हणजेच ‘इंडिया’ अर्थात ‘भारत’च्या ज्या शब्दांचा वापर केला गेला आहे त्यात सरकार ‘इंडिया’ शब्द काढून फक्त ‘भारत’ शब्द ठेवण्यावर विचार करत आहे. 2020 पासूनच यावर चर्चा सुरू झाली होती. संविधानातून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ‘इंडिया’ शब्द हा गुलामगिरीचे प्रतीक आहे त्यामुळे त्या जागी ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ या शब्दांचा वापर व्हावा, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने संविधानात आधीच ‘भारत’ शब्द वापरला आहे असे स्पष्ट करत याचिका फेटाळली होती.

‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?

यामागे राजकारण आहे का ?

देशात 2024 मध्ये लोकसभा (Bharat) निवडणुका होणार आहेत. त्याआधी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या असून आघाडी सध्यातरी अभेद्य दिसत आहे. ‘INDIA’ शब्दाचा अर्थ ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लूसिव्ह अलायंस’ असा आहे. यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी या शब्दावरून आघाडीवर टीका सुरू केली होती.

हिंदुस्तान नाव कसे मिळाले?

देशाला ‘हिंदुस्तान’ या नावानेही ओळखले जाते. मध्ययुगाच्या (Bharat) कालखंडात ज्यावेळी ‘तुर्क’ आणि ‘ईरानी’ लोक येथे आले त्यावेळी त्यांनी सिंधू घाटी मार्गाने प्रवेश केला. हे लोक ‘स’ अक्षराचा उच्चार ‘ह’ असा करत होते. त्यामुळे ‘स’ चा अपभ्रंश होऊन हिंदू झाले. यावरूनच देशाला हिंदुस्तान म्हटले जाऊ लागले. यानंतर हिंदू शब्दावरून हिंदुस्तानचा उल्लेख केला जाऊ लागला.

जम्बूद्वीप

असे म्हटले जाते, जंबूच्या झाडावरून (भारतीय ब्लॅकबेरीचे दुसरे नाव) जम्बूद्वीप नाव मिळाले. विष्णु पुराणातीस दुसऱ्या अध्यायात जम्बू झाडाच्या फळांना हत्ती इतक्या आकाराचे म्हटले आहे. ज्यावेळी ही फळे सडतात आणि पर्वताच्या शिखरांवर पडतात त्यावेळी त्यांच्या रसापासून एक नदी तयार होते. ही नदी किंवा जागेला उल्लेखित करण्यासाठी ‘जम्बूद्वीप’ नाव दिले गेले.

मोदी सरकारने ‘इंडिया’ला कामकाजातून वगळल्याचा आरोप: विरोधकांनी ‘भारत’ला दिला नवा लाँग फॉर्म

भारतखंड

वेद, पुराण, महाभारत आणि रामायण यांसह अन्य भारतीय (Bharat) ग्रंथात भारतखंड नाव सापडते. याचा अर्थ असा आहे की भारताचा भाग म्हणजेच भारत भूमीचा उल्लेख करण्यासाठी ‘भारतखंड’ म्हटले गेले.

आर्यावर्त

असे म्हटले जाते की आर्य लोक हे भारतातील (Bharat) मूलनिवासी होते. आर्य समुद्री मार्गाने येथे पोहोचले आणि त्यांनी हा देश वसवला. या कारणामुळे या देशाला आर्यावर्त असे म्हटले गेले.

हिमवर्ष

हिमालयाच्या नावावरून भारताला (Bharat) आधी हिमवर्ष म्हटले जात होते. वायू पुराणात एका ठिकाणी उल्लेख आहे की खूप आधी भारतवर्षाचे नाव ‘हिमवर्ष’ होते.

 

Tags

follow us