‘बिग बीं’चं ‘भारत माता की जय’; नेटकऱ्यांनी शोधलं ‘इंडिया’चं कनेक्शन!

‘बिग बीं’चं ‘भारत माता की जय’; नेटकऱ्यांनी शोधलं ‘इंडिया’चं कनेक्शन!

President of Bharat : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर फक्त राजकीय क्षेत्रच नाही तर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येत आहेत.

Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं !

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अर्थात बिग बींनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असून अनेकांनी याचं कनेक्शन मोदी सरकारच्या (President of Bharat) सध्याच्या हालचालींशी जोडलं आहे. तसे स्वाभाविकही आहे. कारण, मोदी सरकारने देशाचे ‘इंडिया’ (INDIA) हे नाव हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात कदाचित यासंदर्भात विधेयकही आणलं जाईल अशी चर्चा आहे. नवी दिल्लीत लवकरच G20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी ज्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यावरही ‘President of Bharat’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नेमक्या याच वेळी बिग बी यांनी ‘भारत माता की जय’ असं मोजकंच ट्विट केलं आहे.

मग या ट्विटचा (President of Bharat) अर्थ तरी काय घेणार या प्रश्नाचं उत्तर नेटकऱ्यांनीच दिलं आहे. अमिताभ यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांवरून हे सहज लक्षात येईल. नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी त्यांना ट्रोल केलं आहे तर काही जण समर्थनातही उतरले आहेत. हिमांशू नावाच्या ट्विटर युजरने बच्चन यांनी केलेलच ट्विट पु्न्हा लिहीत समर्थन दिलं आहे. एका युजरने मात्र नाराजी व्यक्त करत देशाचे नाव नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube