Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं !
Sharad Pawar : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची आज जळगावात सभा होणार आहे. या सभेआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलनसाह (Maratha Andolan), राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या कारभाारवर जोरदार प्रहार केले.
Maratha Andolan : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
मोदी सरकारकडून आता देशाचे ‘इंडिया’ हे नाव हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत जी 20 परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीच्या निमंत्रण पत्रिकांवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर पवार (Sharad Pawar) म्हणाले, याबाबत माझ्याकडे जास्त माहिती नाही. इंडियातील सहभागी राजकीय पक्षांची उद्या बैठक बोलावली आहे त्यात या गोष्टीचा विचार होईल. पण, इंडिया हे नाव हटविण्याचा अधिकार कुणालाही नाही. कुणीही हे नाव हटवू शकणार नाही. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या लोकांत अस्वस्थता का आहे?, असा प्रश्न मला पडतोय.
भाजपचे लोक डरपोक, सरकारचं अधःपतन निश्चित – वडेट्टीवार
या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही केंद्र सरकावर आगपाखड केली. विरोधकांच्या इंडिया आघाडीला हे लोक घाबरले आहेत, भांबावले आहेत. भाजपचे (BJP) लोक डरपोक आहेत. त्यामुळे ते विषयांना फाटे फोडण्याचं काम करत आहेत. हे लोक घमेंडी असं संबोधतात. पण, घमेंडी कोण आहे हे देशाला चांगलंच ठाऊक आहे. इंडिया आघाडी मजबूत आहे. पण काहीही केलं तरी या सरकारचं अधःपतन इंडियात झाल्याशिवाय राहणार नाही.
किती फसवणूक करणार! फास आवळत राऊतांचे ‘त्रिशूळ’ सरकारला चार मोठे प्रश्न
राज्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर, सरकारने लक्ष द्यावे – पवार
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. त्याची माहिती (Sharad Pawar) घ्यावी. लोकांशी संपर्क साधावा आणि लोकांची परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहचवावी. त्यासाठी मी काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. मराठवाड्यात, कोल्हापूरमध्ये जाऊन आलो. तर आज जळगावमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यात राज्यात शेतीची समस्या गंभीर बनत चालली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. जनावरांना चारा नाही. त्याची व्यवस्था सरकारने करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्यापुढे या समस्या मांडणार आहोत, असे पवार म्हणाले.