किती फसवणूक करणार! फास आवळत राऊतांचे ‘त्रिशूळ’ सरकारला चार मोठे प्रश्न

  • Written By: Published:
किती फसवणूक करणार! फास आवळत राऊतांचे ‘त्रिशूळ’ सरकारला चार मोठे प्रश्न

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी दोन हजार कोटी दिल्याचे सांगितले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फास टाकत सत्तेतील त्रिशूळ सरकारला चार मोठे प्रश्न विचारत पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार असा तिरकस प्रश्नदेखील मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. ट्विट करत राऊतांनी हे चार प्रश्न विचारले आहेत. काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले”, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत.” मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार ? असे म्हणत माझे सरकारला चार प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारने द्यावी असे राऊतांनी म्हटले आहे.

राऊतांचे प्रश्न नेमके काय?

प्रश्न १) ‘सारथी’द्वारे पदवीसाठी ३० लाख, तर पीएचडी साठी ४० लाखांच्या मर्यादित शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ओबीसी व समाजकल्याण विभागाद्वारे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शुल्क (रकमेची मर्यादा नाही), याशिवाय विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा, स्टेशनरी शुल्क, अर्जाचे शुल्क देण्यात येते. याला कोणतीही मर्यादा लावली जात नाही. मात्र, सारथीला मर्यादा का ? असा प्रश्न सरकारला आहे.

प्रश्न २) ७५ जागांसाठी फक्त ८२ अर्ज संस्थेला प्राप्त झाले आहेत. आपल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तरी सारथीने मुदतवाढ का दिली नाही ?

प्रश्न ३) ओबीसी आणि समाजकल्याणसाठी पदवीला ५५ ते ६० टक्क्यांची अट, मग सारथीला ७५ टक्क्यांची अट का?

प्रश्न ४) जाहीरतीवर कोट्यावधी खर्च मग सारथीच्या योजनावरती का नाही?

‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?

राऊतांच्या प्रश्नांवर सरकार काय उत्तर देणार

एकीकडे राऊतांनी गंभीर प्रश्न विचारत सरकारला एकप्रकाके कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर आता सरकारकडून कशाप्रकारे उत्तरे दिली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, येत्या काळात राऊतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

पत्रकार परिषदेतही घेरलं

वरील प्रश्न विचारण्यापूर्वी राऊतांनी आज (दि. 5) पत्रकार परिषदेदरम्यानही राऊतांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, मराठा समाजाने यावेळी अत्यंत सावध पवित्रा घेतलेला असून, सरकार एकीकडे या समाजातील लोकांना आश्वासन देतात खोट्या घोषणा करतात. एका बाजूला चर्चा करण्याच ढोंग करतात तर, दुसऱ्या बाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडायला सांगतात आणि अंगावर आलं की काखावर करतात. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका.

Maratha Reservation च्या अध्यादेशावर जरांगे ठाम; सरकार म्हणतंय, कोर्टात टिकणार नाही

मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात गेले तेथे वकीलही तुमचेच होते. तुम्ही नेमलेले प्रपोजल झाले, आमच्या सरकारने ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला संपूर्ण ड्राफ्टिंग, प्रपोजल, वकील किंवा कायदेशीर लढाई हे तुम्हीच करत होता असेही राऊतांनी यावेळी सांगितले. आम्ही पुढे नेलं म्हणजे तुम्ही चुकला होतात तुम्ही काहीतरी घोळ केले होते असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.

आमिष दाखवूनही जरांगे झुकत नाही 

जालन्यामध्ये एका लहानशा खेड्यामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसतो आणि त्याच्या पुढे इतकी आमिष, इतके दबाव येऊन देखील तो झुकत नाही याचं कौतुक आहे. यावरून महाराष्ट्राला सरकारने दिलेली वचन किती पोकळ आणि फसवी होती हे सिद्ध झाले असल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube