Maratha Reservation च्या अध्यादेशावर जरांगे ठाम; सरकार म्हणतंय, कोर्टात टिकणार नाही
Maratha Reservation : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे काहीसा थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश तात्काळ काढा अशी भूमिका मांडलीय. त्यामुळे तर राज्यसरकर कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन; धुळ्यात सापडलेले होते बेवारस अवस्थेत
ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी देखील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत एका दिवसात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी भूमिका मांडली आहे. मात्र त्यात कायदेशीर अडचणी आहेत. असं एका दिवसात अध्यादेश काढता येत नाही. तो कोर्टात टिकणार नाही. अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यसरकारच्या मंत्रिमंडळ समितीचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. त्यात अद्यापही जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून हे आंदोलन देखील सुरूच आहे. त्यात त्यांनी राज्यसरकारने तात्काळ म्हणजेच एका दिवसात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे सरकार पुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे.
World Cup 2023 : विश्वचषकासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा; तीन दिग्गजांना बाहेरचा रस्ता?
सरकारपुढे अडण काय?
जरांगे यांनी राज्यसरकारने तात्काळ म्हणजेच एका दिवसात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अध्यादेश काढावा अशी भूमिका मांडली आहे. मात्र असं एका दिवसात अध्यादेश काढता येत नाही. तो कोर्टात टिकणार नाही. असा कायदेशीर पेच सरकार पुढे उभा राहिला आहे. त्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यसरकारच्या मंत्रिमंडळ समितीचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.
दरम्यान मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल सोमवारी पार पडली. त्यावेळी देखील मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघेल अशी आपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी जेव्हा जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे म्हटले की, एका दिवसात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढायला काहीही हरकत नाही.