World Cup 2023 : विश्वचषकासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा; तीन दिग्गजांना बाहेरचा रस्ता?

  • Written By: Published:
World Cup 2023 : विश्वचषकासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा; तीन दिग्गजांना बाहेरचा रस्ता?

India World Cup Squad 2023 : आगामी विश्वचषकासाठी आज (दि. 5) भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघात 18 पैकी 15 खेळाडूंना स्थान दिले जाईले असे यापूर्वीच निवडकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संघात नेमक्या कोणत्या खेळाडूंना स्थान दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, तीन दिग्गज खेळाडूंना बाहेर बसवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च; ५ सप्टेंबरला सचिन करणार ट्रेलर प्रदर्शित

एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियासह अन्य प्रमुख संघांनी यापूर्वी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा विश्वचषकाचे यजमानपद असणाऱ्या भारतीय संघाच्या निवडीकडे लागल्या आहेत.

तीन दिग्गज खेळाडूंना स्थान नाही
विश्चचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी निवड समितीच्या वरिष्ठ सदस्यांनी 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. यात संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान देण्यात आलेले नाही. संघ जाहीर झाल्यानंतर 27 सप्टेंबर 2023 पर्यंत टीममध्ये बदल करता येणे शक्य आहे. परंतु, त्यानंतर संघात बदल करायचे असल्यास संबंधित संघाना इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.

Asia Cup 2023 : कन्फर्म! भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी पुन्हा भिडणार

एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संभाव्य संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यासह शार्दुल ठाकूर आणि कुलदीपला संधी दिली जाऊ शकते.

IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब

असा असू शकतो संभव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube