Elon Musk : एलॉन मस्कने शेअर केला सेक्सी फोटो, चाहते रागावले

ट्विटर ( Twitter )  कंपनीचे सीईओ एलॉन मस्क ( Elon Musk )  हे अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरच्या अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. यूजर्सना आकर्षित करणाऱ्या ब्ल्यू टिक ( Blue Tik )  मध्ये देखील त्यांनी बदल केला. ज्याला ब्ल्यू टिक पाहिजे आहे तो पैसे देऊन ब्ल्यू टिक घेऊ शकतो, असा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (9)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (9)

ट्विटर ( Twitter )  कंपनीचे सीईओ एलॉन मस्क ( Elon Musk )  हे अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरच्या अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. यूजर्सना आकर्षित करणाऱ्या ब्ल्यू टिक ( Blue Tik )  मध्ये देखील त्यांनी बदल केला. ज्याला ब्ल्यू टिक पाहिजे आहे तो पैसे देऊन ब्ल्यू टिक घेऊ शकतो, असा नियम मस्क यांनी केला. त्यांचा हा निर्णय अनेक यूजर्सना आवडला नव्हता.

त्यांनी आता एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोमुळे अनेक नेटकरी रागावले आहेत. काहींनी आम्ही आता ट्विटर वापरणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच हा एक कौटुंबीक प्लॅटफॉर्म आहे, इथे असा फोटो टाकणे शोभते का, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

मस्क यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन मुली दिसत आहेत. यात एक मुलगी दुसऱ्या मुलीला दूध पाजताना दिसत आहे. यातील एका मुलीच्या फोटोवर ‘ट्विट्स ऑफ इलॉन मस्क’ लिहिलेले आहे, तर दुसऱ्या मुलीच्या फोटोवर ‘ट्विटर’ असे लिहिले, असे लिहले आहे. या फोटोचे नेटकऱ्यांनी अनेक वेगवेगळे अर्थ काढले आहेत. तर काही जण हा फोटो पाहून तीव्र संतापले आहेत.

 

मस्क यांच्या या ट्विटवर एकाने म्हटले आहे की, आता बासं, मी आता अधिकृतपणे ट्विटर वापरणे बंद करत आहे. माझा विश्वास बसत नाही, की मस्क तु हे शेअरे केले आहेत. तर एकाने कमेंट केली आहे की, हा माझा कौटुंबिक प्लॅटफॉर्म आहे. माझी मुलं हे काय पाहतील, असे एकाने म्हटले आहे.

दरम्यान ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरवर खुप सक्रीय असतात. ते कायम वेगवेगळे मीम्स आपल्या ट्विटर हँडेलवरुन शेअर करत असतात. या माध्यमातून ते लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.

Exit mobile version