Download App

jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

  • Written By: Last Updated:

Kupwara Encounter: मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवाया सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कर ही तितकेच सज्ज आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. माछिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांनी गुरुवारी घुसखोरांचा कट उधळून लावला. यावेळी लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

महाविकास आघाडीचे नेते श्रीवर्धनमध्ये एकत्र, सुनील तटकरेंविरोधात बांधणार मोट 

यापूर्वी लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर दोन दहशतवादी मारले. अशा प्रकारे लष्कराच्या जवानांनी एकूण 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुपवाडा येथे दहशतवादी लपल्याची माहिती भारतीलय लष्कराला मिळाली होती. या माहितीनंतर
भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी 26 ऑक्टोबर रोजी संयुक्त ऑपरेशन केले. त्या ऑपरेशन दरम्यान जवानांनी कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा कट उधळून लावला. या कारवाईत सुरुवातीला दोन दहशतवादी मारले गेल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे माछिल सेक्टरमध्ये घुसखोरांचा तपास सुरू करण्यात आला. यानंतर माछिलमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सुरक्षा दलांनी सुरुवातीला दोन दहशतवाद्यांना ठार केले. यानंतर आता एडीजीपी काश्मीर यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची पुष्टी केली. आतापर्यंत एकूण पाच दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं.

गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, दहशतवादी पुलवामा हल्ल्याप्रमाणे सुरक्षा दलाच्या ताफ्यांना किंवा त्यांच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई कऱण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जागतिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या एका खास व्यक्तीनची हत्या करण्यात आली होती. दाऊद मलिक असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जैश-ए-मोहम्मदसोबत दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जांगवी या संघटनेसाठी काम करत होता. भारताने मसूद अझहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम यांना दहशतवादी घोषित केले होते.

Tags

follow us