Unseasonable Rain : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; वीज कोसळून 4 जण ठार
राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला असून वीज कोसळल्याने 4 जण ठार झाल्याची घटना घडलीय. जम्मू-काश्मीर खोऱ्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ढगफुटी आणि वीज कोसळण्याच्या घटनेमुळे एका दांपत्यासह ४ लोक ठार झाले.
मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी…
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पंपोरमध्ये शनिवारी ढगफुटीची घटना झाली. यामध्ये हिलाल अहमद हांजी (२५) आणि त्यांची पत्नी रोजिया जान (२५) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुसरीकडे, बडगाम जिल्ह्यातील मुजपथरी भागात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.
कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचं संकट अद्यापही कायमच असून अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातचे पिक वाया गेले आहे. अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यांत पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात मोका वादळ निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.