मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी…

मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी…

Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. शरद पवारांनी आज देवेंद्र फडणवीसांशी फोनद्वारे संपर्क साधत विद्यार्थ्यांनी माघारी आणण्याची विनंती केली आहे.

कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनद्वारे विद्यार्थ्यांची विचारपूस करीत माहिती घेतली आहे. जवळपास 14 विद्यार्थ्यांना मणिपूरच्या शिवसेना भवनात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या 14 विद्यार्थ्यांना अन्नासह जीवनावश्यक वस्तूही पोहोच करण्यात आल्या आहेत तर बाकी 8 विद्यार्थ्यांनाही लवकरच आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुनावलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे विद्यार्थ्यांकडून विचारपूस करीत असून तिथल्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.

राणेंकडून मुलांची पाठराखण, ‘ते काही दारु पिऊन बोलत नाहीत… राणेंच रक्त बोलणारचं’

मैतई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दंगल उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दंगलखोरांना गोळ्या झाडण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. तर हिंसाचारग्रस्त इम्फाळ खोऱ्यात अस्वस्थ शांतता असूनही शुक्रवारी मणिपूरमधून हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. अहवालानुसार, एकूण 13,000 लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले.

दरम्यान, मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दंगलग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमित शाह हे राज्य आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. अमित शाह दिल्लीत आहेत आणि मणिपूरमधील परिस्थितीबद्दल सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांकडून नियमित अपडेट घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube