कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?

कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय?

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंचं तापत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय. दोन दिवसांपूर्वीच माढ्यात ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेच उद्घाटन करण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं मात्र, या स्पर्धेच्या उद्घाटनाचं निमंत्रण खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकरांसह आमदार राम सातपुतेंना देण्यात आलं नव्हतं. त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला नसल्याने मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमधील मतभेद टोकाला गेल्याचे बोललं जात आहे.

Ajit Pawar : मुलींना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करा

मागील अनेक दिवसांपासून खासदार नाईक-निंबाळकर, आमदार सातपुते आणि मोहिते पाटलांमध्ये अंतर्गत युद्ध सुर असल्याचं दिसून येतंय. निंबाळकर आणि सातपुते दोन्ही नेते आपल्या मतदारसंघातले निर्णय स्वत:च्या पातळीवर घेत असल्याचं बोललं जातंय. कोणत्याही निर्णयामध्ये मोहिते पाटील कुटुंबातील एकाही सदस्याला घेतलं जात नाही. निधीच्या वाटपाबद्दलही त्यांना विचारात घेतलं जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याबाबत अद्याप कोणीही दुजोरा दिला नसून अशा चर्चा ऐकण्यास येत आहेत.

एटीएसने लखनौ येथून दोन पीएफआय एजंटला केले अटक, गुप्तचर यंत्रणेची चौकशी सुरु

मोहिते पाटील यांच्यात आणि खासदार आमदार यांच्यात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं बोललं जातंय. तर कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला न बोलावणं ही बाब आमदार खासदारांनी गंभीर घेतल्याच्याही चर्चा आहे. आगामी निवडणुकीमध्ये हा मतभेद टोकाला गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स पाहून चाहतेही भारावले

तर संजीवबाबा निंबाळकर यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून घेतले जाते. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या मनात नक्की काय चालले आहे, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु असतात. त्यामुळे माढ्यामध्ये भाकरी फिरवणार का? अशी चर्चा होत आहे.

Urfi Zeenat Aman: उर्फी अन् झीनत अमान यांच्यात नेमकं काय घडलं? घ्या जाणून…

मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असणारा माढा लोकसभा मतदारसंघ विजयसिंह मोहिते-पाटील खासदार असताना रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सोडण्यात आला. व रणजीतसिंह नाईक-निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या विजयामध्ये मोहिते-पाटील परिवाराचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

सध्या रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळावी, अशी मागणी सोशल मीडियावर कार्यकर्ते करताना दिसतात. त्यामुळे मोहिते-पाटलांच्या मनात नक्की काय चाललंय? मोहिते-पाटलांचे हे धक्कातंत्र कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube