Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स पाहून चाहतेही भारावले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T215645.403

Jawan Teaser: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. कारण या वर्षी तो ३ सिनेमामधून आपल्या चाहत्यांना भेटीला येणार आहे. त्यांपैकी त्याचा ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) या २ सिनेमामध्ये तो या वर्षी झळकणार असल्याची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


किंग खानच्या ‘जवान’ (Jawan Teaser) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. आता अखेर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. किंग खानने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या सिनेमाकडे लागले होते. यातील त्याच्या फर्स्ट लूकची जोरदार चर्चा चाहते करत आहेत. गेल्या अनेक दिवस शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.

या सिनेमाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदली गेली असल्याची चर्चा रंगत होत्या. आता अखेर या सिनेमाचा टीझर शेअर करून या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. किंग खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


या टीझरमध्ये किंग खान त्याच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधला आहे, तसेच हातात भाला घेऊन हवेत उडी मारून खाली येत असल्याचे चाहत्यांना दिसून येणार आहे. या टीझरमध्ये अटली या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत, तर गौरी खान ‘रेड चिली एंटरटेनमेंट’च्या मार्फत या सिनेमाची निर्मिती करत असल्याचे किंग खानने लिहिले आहे. तर या सिनेमाच्या टीझरच्या शेवटी या सिनेमाच्या प्रदर्शनाची बदल करण्यात आलेली तारीख जाहीर कातरण्यात आली आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

त्यानुसार आता हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे किंग खानच्या चाहत्यांना मोठी आतुरता लागली आहे. किंग खानने हा टीझर शेअर करताच प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. या सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत, अशा कमेंट्स करत चाहते या सिनेमाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

शाहरुख खानसोबत या सिनेमात दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे, तर या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिका साकारत असल्याचे दिसून येणार आहे.

Tags

follow us