Download App

बँकांची नोट बदलण्याची तयारी पण लोकचं फिरकली नाहीत !

Rs 2000 Note Exchange : आरबीआयने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा वैध राहतील आणि बँकांमध्ये जाऊन त्या जमा किंवा बदलता येतील, असे सांगितले होते. त्यानुसार आजपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी 2000 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार अनेक बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ठोस तयारी पाहायला मिळाली. बँकांच्या शाखांमध्ये नोटा बदलण्यासाठी काउंटर उभारण्यात आले होते, परंतु नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले नाहीत. सामान्य दिवसांप्रमाणेच लोक बँकेत पोहोचून आपली कामे करून घेत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून दोन हजाराच्या नोटा जमा केल्या जात आहेत.

जिल्हा बँकाकडे 112 कोटींच्या जुन्या नोटा धूळखात; आता 2000 च्या नोटा स्विकारण्याची धास्ती

नोटा बदलून देताना काही बँकांनी आरबीआयच्या आदेशांची पायमल्ली केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. वास्तविक 2000 रुपयांची नोट जमा करण्यासाठी कोणताही फॉर्म भरला जाणार नाही, असे आरबीआयने सांगितले होते. एकाच वेळी दोन हजार रुपयांच्या 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतात किंवा बँकांमध्ये जमा करता येतात. नोट बदलण्यासाठी ग्राहकांना कोणतेही ओळखपत्र किंवा कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज देण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले होते.

दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे ही नोटाबंदी नसून एक वैधानिक प्रक्रिया होती आणि कामकाजाच्या सोयीसाठी त्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने सांगितले की, वकिलाच्या जनहित याचिकांवर आम्ही योग्य आदेश देऊ.

UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही टॉपर मुलीच

● 2,000 रुपयांच्या बहुतांश नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. त्यांचे अंदाजे आयुर्मान चार ते पाच वर्षे होते.
● दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआय आणि एसबीआयच्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकावरील आदेश राखून ठेवला आहे.
● कोणत्याही स्लिप किंवा ओळखीच्या पुराव्याशिवाय ग्राहक दोन हजारांची नोट बदलू शकतील, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

Tags

follow us