Download App

ब्रृजभूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनाचा खर्च भागवतांना कुस्तीपटूंची दमछाक; 5 दिवसांत झाला इतका….

  • Written By: Last Updated:

Exhaustion of wrestlers while paying the expenses of the agitation against Brijbhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना हे आंदोलन आर्थिकदृष्ट्या चांगलचे महागात पडत आहे. तरी देखील कुस्तीपटूंचा हा ब्रृजभूषण यांच्या विरोधात लढा सुरू आहे. बृजभूषण यांना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

कुस्तीगीरांनी कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख असलेल्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. याविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या या कुस्तीगिरांना आंदोलन करण्यासाठी मागील 5 दिवसांत तब्बल 5 लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. कारण, आंदोलनस्थळी अनेक गोष्टी, सोयीसुविधा पुरवाव्या लागत आहेत. त्यात गाद्या, चादरी, पंखे, पाणी, खाण्यापिण्याच्या वस्तू आदी सुविधा पुरवल्या जात आहेत.

या आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला बऱ्याच गोष्टी भाड्याने आणल्या होत्या. गाद्या, चादरी आणि ‘साउंड सिस्टम’ या गोष्टी भाड्याने आणले होते. त्यासाठी दर दिवशी 27000 हजार खर्च आला आहे. हे आंदोलन आव्हानात्मक असल्यानं फार काळ चालेल, याची कल्पना आंदोलनकर्त्यांना होती. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी भाड्याच्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा पैसे खर्च करून आवश्यक त्या गोष्टी विकत घेतल्या.

मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार, 147 जनावरे, 1178 कोंबड्या अन् तब्बल 10 जणांचा मृत्यू

विनेश फोगटचे पती सोमवीर राठी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही स्पीकर आणि मायक्रोफोन्स भाड्याने घेतले होते, पण एका दिवसासाठी 12,000 रुपये खर्च आला. ते खूप होते. आता आम्ही आमची ‘साउंड सिस्टीम’ चांदणी चौक बाजारातून 60,000 रुपयांना विकत घेतली आहे. दुकानदाराला पैलवानांची माहिती होती, म्हणून त्याने आम्हाला वस्तू ना नफा तत्वावर दिल्या. पंखे आणि जनरेटर अजूनही भाड्यावर आहेत. दोघांसाठी त्याला दररोज 10,000 रुपये खर्च करावे लागतात. राठी यांनी सांगितले की, ‘गरज पडल्यास कुलर घेऊ. कारण, बाहेर खूप गरम आहे. आम्ही आमच्यासोबत 2 लाख रुपये रोख आणले होते, परंतु आतापर्यंत सुमारे 5 ते 6 लाख रुपये खर्च केले आहेत.

ते म्हणाले, आमच्या आंदोलनालाा कुठल्याही राजकीय पक्ष किंवा बड्या हस्तीचं पाठबळ नाही. ते असतं तर आज हे कुस्तीगीर तुम्हाला ‘वॉटरप्रूफ’ छत आणि विविध सोयीसुविधांसह आंदोलन करताना दिसले असते. हे कुस्तीगीर कमीतकमी सुविधांसह आंदोलन करत आहेत. सध्या या आंदोलनाचा खर्च हा विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंगच्या कुटुंबाकडून केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us