Exit Poll : आज चर्चा सुरू आहे ती एक्झिट पोलची. (Exit Poll) देशात रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकांना एक्झिट पोलची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार याचा अंदाज बांधला जातो. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व्हेक्षण केले जाते. मात्र या एक्झिट पोलची सुरूवात कशी झाली. त्याचा इतिहास काय? हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे जाणून घेऊ एक्झिट पोलची सुरूवात कशी झाली. त्याचा इतिहास काय? याबद्दल सविस्तर…
एक्झिट पोलचे जनक कोण? त्याचा इतिहास काय?
आज सायंकाळी देशातील पाच राज्यांतील निवणुकांच्या निकालाचे एक्झिट पोल जाहिर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाज वर्तवला जाणार आहे. मात्र या एक्झिट पोलची सुरूवात 56 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये झाली होती. त्यानंतर जगातील अनेक देशांनी या पद्धतीचा अवलंब केला. तसेच या एक्झिट पोलचे जनक म्हणजे रिसर्च आणि सर्व्हेक्षणामध्ये आवड असणारे अमेरिकन राजकारणी पॉल्सटर वॉरेन हे होय.
T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं रचला इतिहास! T20 वर्ल्डकपसाठी ठरला पात्र…
1967 मध्ये अमेरिकन राजकारणी पॉल्सटर वॉरेन यांनी पहिल्यांदा आणि सर्वात मोठा एक्झिट पोल बनवला होता. त्यांनी एका संस्थेसाठी हा एक्झिट पोल तयार केला होता. त्यानंतर हा प्रकार प्रचलित झाला. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकीमध्ये एक्झिट पोल जाहिर केले जाऊ लागले. अनेक वृत्तसंस्थांनी अशा प्रकारे एक्झिट पोल जाहिर करायाला सुरू केले.
गौतम अदाणी पुन्हा टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात 55000 कोटी कमावले
1980 मध्ये तर अमेरिकन टेलिव्हिजन नेटवर्क एनबीसीने तर मतदान संपण्याच्या 3 तास अगोदरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार रोनॉल्ड रीगन आणि जिम्मी कार्टर यांच्याबाबतचा एक्झिट पोल जाहिर केला होता. 1990 मध्ये अनेक न्यूज कंपन्या आणि असोसिएटेड प्रेस यांनी एकत्र येत एक्झिट पोलसाठी एक पोलिंग कंसोर्टियम बनवलं. ज्याच नावं वोटर न्यूज सर्व्हिस म्हणून ओळखण्यात आलं. त्यामुळे वेग-वेगळ्या संस्थांना रिपोर्ट्स आणि संशोधनासाठी येणारा खर्च कमी करण्यास मदत झाली.
रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
दरम्यान अनेरक वर्ष एक्झिट पोल जाहिर केल्यानंतर प्रसिद्धी मिळवल्यानंतर 2002 मध्ये यावरून वाद निर्माण झाला. कारण कम्प्यूटरमध्ये बिघाड झाला. त्यावरून कंपनीच्या एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर हे बंद करण्यात आले आणि वेगवेगळ्या संस्थांकडून राष्ट्रीय निवडणूक न्यूज पोलची सुरूवात झाली. मात्र 2004 मध्ये ही संस्था देखील मतदानाच्या दिवशीच ऑनलाईन डेटा लिक झाल्याने वादात सापडली. नंतर बंद करण्यात आली.
एक्झिट पोल सांगताता की, कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार ते मतदान संपण्याच्या 30 मिनिट अगोदर जाहिर केले जातात. त्यासाठी मतदारांचे सर्व्हेक्षण केले जाते. सर्व्हे एजन्सी त्यासाठी मोठ्या टीम कामाला लावतात. ही टीम मतदानाच्या दिवशी यावर काम करते. मात्र हा एक अंदाज असतो. एक्झिट पोल 100 टक्के खरे असतील असं नाही.