रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

Dhananjay Munde On Rohit Pawar :
रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. या शिबिरात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या गोटात असतानाचे अनेक खुलासे केले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर आमदारकी मिळवण्यासाठी गेले होते. तेच रोहित पवार आज अजित पवार यांच्यावर टीका करीत असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकरांना अटक करा; दंगलीच्या विधानावरून दंड थोपटत राणेंची मोठी मागणी

कर्जत-जामखेडचे एक उतावले झाले आहेत, त्यांना वाटतं दादांची जागा त्यांनी घेतली आहे. पण त्यांनी स्वतः काय ते बघावं. कर्जत-जामखेडची उमेदवारी घेण्यासाठी हे महाशय भाजपच्या दारी गेले होते. एका खासदारामार्फत हे महाशय भाजपाच्या दारी गेले, पण तिकीट मिळालं नाही. आता हे भाजपच्या मुद्यावरुन अजितदादांवर आरोप करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे शरद पवार यांनी राज्यभरात दौरा करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधत जाहीर सभा घेतल्या तर दुसरीकडे अजित पवार गटानेही शरद पवारांच्या जाहीर सभेतील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांंनी राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार युवकांशी संवाद साधत आहेत.

‘तुमच्या नेत्यांना सांगा, ते म्हणाले तर राजीनामा…’; विखेंच्या टीकेवर भुजबळांकडून रोखठोक प्रत्युत्तर

आमदार रोहित पवार या संघर्ष यात्रेच्या सभेतून अजित पवार गटाच्या नेत्यांची पोलखोल करीत आहेत. अशातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून रोहित पवारांच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीत असतानाच रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी उतावीळ झाल्याचं मुंडे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनाही सोडल्याचं दिसलं नाही.

धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्हा सर्वांची एकाच व्यक्तीमुळे अनेकांची कोंडी झाली होती. आम्ही पक्ष का सोडला, यापेक्षा आम्हाला पक्ष का सोडावा लागला. याचेही विचार होणे गरजेचं आहे, असं सांगत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

तटकरेंनी मला पाठवलं नसतं तर देशमुख बाहेर नसते…
भाषणादरम्यान, बोलताना धनंजय मुंडे यांनी अनिल देशमुखांवरही भाष्य केलं. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या वेळी मला आणि तटकरेंना अजितदादांनी हेलिकॉप्टरने पाठवलं नसतं तर हे महाशय आजदेखील जेलमधून बाहेर निघाला नसता, अशा शब्दांत मुंडेंनी अनिल देशमुख यांच्यावर देखील टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube