‘तुमच्या नेत्यांना सांगा, ते म्हणाले तर राजीनामा…’; विखेंच्या टीकेवर भुजबळांकडून रोखठोक प्रत्युत्तर

  • Written By: Published:
‘तुमच्या नेत्यांना सांगा, ते म्हणाले तर राजीनामा…’; विखेंच्या टीकेवर भुजबळांकडून रोखठोक प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal on Radhakrishna Vikhe : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यात रान पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांसह अन्य ओबीसी नेते जरांगेच्या मागणीला विरोध करत आहे. दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजब (Chhagan Bhujbal) राईचा पर्वत करत असल्याची टीका करत भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) केली होती. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटलांना जर माझा राजीनामा हवा असेल तर त्यांनी हे आपल्या नेत्यांना सांगावे, असे प्रत्युत्तर भुजबळांनी दिले.

लोकसभेसोबत विधानसभा होणार की नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले…

छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना विखेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता, ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझा राजीनामा हवा असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांना तसं सांगावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणतीही तंबी देण्यात आली नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

वॉरन बफे यांना ‘सिगार बट’ची थ्योरी देणारा चार्ली गेला! 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भुजबळ नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी मी जोवर आमदार आहे, तोवर नाशिकला येणार असल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. इथले कार्यकर्ते मला फोन करून बोलावत होते. कांदा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादकांना मदत करण्याचा मुद्दा आज मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. फळबागा शेतकरी श्रीमंत आहेत त्यामुळे त्यांना मदत नको, असं झालं नाही पाहिजे. त्यांच्या डोक्यावर कर्ज असतं. त्यांना लवकर पिक घेता येत नाही. 3-3, 4-4 वर्ष ते आता उभे राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पॅकेज द्यावे लागेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि वेगळी सोय करण्याचं आश्वासन दिलं.

काय म्हणाले विखे पाटील?
मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांवर टीका केली होती. दोन समाजात विनाकारण तेढ निर्माण केली जात असून ओबीसी विरुद्ध मराठा वाद निरर्थक असल्याचे ते म्हणाले. भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार पॉसिटीव्ह विचार करत आहे. पण छगन भुजबळ राईचा डोंगर उभा करत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून आरक्षणावर असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. त्यांनी आपली मुक्ताफळे उधळणं थांबवावं, असा सल्ला विखे-पाटील यांनी दिला. त्यांच्या वक्तव्याने सरकारममध्ये एकमत नसल्याचं संदेश जातो, भुजबळांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विखे पाटलांनी केली.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ आणि विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube