What Is Inheritance Tax How It Is Calculated : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र, काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळे अडचणीत सापडली आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकाचा हवाला देत वारसा कराबाबत (Inheritance Tax) भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, नेमका हा कर काय आणि अमेरिकेसह किती देशांमध्ये वारसा कराचा कायदा अस्तित्वात आहे हे आपण जाणून घेऊया.
100 हून अधिक पेटंट अन् देशात टिव्ही, मोबाईल आणणाऱ्या पित्रोदांमुळे काँग्रेस अडचणीत
नेमके काय म्हणाले होते पित्रोदा?
शिकागो येथील एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते की, “अमेरिकेत वारसा कराचा कायदा आहे. यात जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना केवळ 45 टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरित 55 टक्के सरकारच्या तिजोरीत जाते असे पित्रोदा म्हणाले होते.
वारसा कर म्हणजे काय?
वारसा कर हा एखाद्या मृत व्यक्तीकडून वारसाहक्काने पैसे किंवा मालमत्ता मिळवणाऱ्या व्यक्तीने भरलेला कर आहे. मालमत्तेचा वारसा मिळालेली व्यक्ती वारसा कर भरते. वारसा कर हा मृत व्यक्तीकडून त्याच्या वारसांना किंवा लाभार्थ्यांना मालमत्ता किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणावर लावला जाणारा कर आहे. या कराचे मूल्यमापन सामान्यतः देशाच्या राज्य किंवा फेडरल स्तरावर केले जाते. हा कर मृत व्यक्ती कोठे राहत होता आणि त्यांची मालमत्ता कुठे आहे या अधिकारक्षेत्राच्या कायद्यांवर देखील अवलंबून असते.
धक्कातंत्राची परिसीमा! भाषणावर प्रभावित झाले, टेबल बडवले त्याच खासदाराला मोदी-शाहंनी घरी बसवले
अमेरिकेत वारसा कराचे नियम काय आहेत?
जगभरातील अनेक देशांमध्ये वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कर लावला जातो. हा कर वारसाहक्काने मिळालेल्या व्यक्तीला भरावा लागतो. अमेरिकेत वारसा कर ही सामान्य प्रथा नाही. 2023 पर्यंत फक्त सहा राज्यांमध्ये वारसा कर वसूल केला जात आहे. मरण पावलेली व्यक्ती कोणत्या राज्यात राहत होती किंवा त्याची मालमत्ता कोणत्या राज्यात होती यावर हा कर अवलंबून आहे. तसेच, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचे मूल्यावर आणि मृत व्यक्तीशी त्याचे नाते यावर कर अवलंबून आहे.
अमेरिकेतील या राज्यांमध्ये वसूल केला जातो वारसा कर
अमेरिकेतील घेतला जाणारा वारसा कर सध्या आयोवा, केंटकी, मेरीलँड, नेब्रास्का, न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनिया सारख्या राज्यांमध्ये वसूल केला जातो. येथे एखाद्याला वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कर लावण्याची परंपरा आहे. त्याच वेळी यूएस सरकार मोठ्या मालमत्तेवर थेट मालमत्ता कर लादते. मात्र या मालमत्तेतून काही उत्पन्न असेल तर, त्यावरही वेगळा आयकर लावला जातो. अमेरिकेत वारसाहक्काने मालमत्तेवर स्वतंत्र वारसा कर लागत नाही.
सुरुवात उदयनराजेंपासून… पवारांनी पाच वर्षात मान्य केल्या ‘पाच चुका’
वारसा कर कसा कॅल्कयुलेट केला जातो?
वारसा कराचे कॅल्क्युलेशनात देशानुसार बदल होतात. साधारणपणे वारसा कर हा प्रगतीशील दराचे (Progressive Rate) अनुसरण करते. वारसा कराचा रेट वारशाच्या मूल्यावर आणि ते प्राप्त करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. हे सर्व विचारात घेऊन, वारसा कराचं कॅल्क्युलेशन सरकत्या आधारावर केली जाते. वारसाहक्काचे मूल्य निर्धारित मर्यादा ओलांडत असल्यास कराची रक्कमही वाढते. याव्यतिरिक्त, तुम्हाला मिळणारी सूट आणि तुमच्याकडून आकारला जाणारा कराचा रेट मरण पावलेल्या व्यक्तीशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावरही अवलंबून असतो.
कोणत्या देशांमध्ये किती वसूल केला जातो वारसा कर ?
फेडरल आणि इस्टेट इनहेरिटेंस टॅक्स अराउंड द वर्ल्डच्या एका सर्व्हेमध्ये जगात कोणकोणत्या देशात किती वारसा कर आकारला जातो याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जापानमध्ये 55%, साउथ कोरिया 50%, फ़्रांस 45% , ब्रिटेन 40%, अमेरिका 40%, स्पेन 34%, आयरलैंड 33%, बेल्जियम 30%, जर्मनी 30%, चिली 25%, ग्रीस 20%, नीदरलँड 20%, फ़िनलँड 19%, डेनमार्क 15%, आइसलँड 10%, तुर्की 10%, पोलँड 7%, तर स्विट्जरलँड 7% आणि इटलीमध्ये 4 टक्के वारसा कर वसूल केला जातो.