Download App

…तो हम हर जगह रायता फैलाएंगे; मतं चोरीच्या आरोपांवरून कंगनाचा राहुल गांधींचा निशाणा

Kangana Ranaut ने मतांच्या चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील फटकारले आहे.

Kangana Ranaut targets Rahul Gandhi over vote-rigging allegations on BJP : अभिनेत्री आणि भाजप आमदार कंगना रनौत नेहमीच कुणा ना कुणावर टीकेचे बाण सोडत असते. यावेळी तिने मतांच्या चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील त्यांना फटकारले आहे.

War 2 ची तुफान क्रेझ; भारतात 4 दिवसांत गाठला 187 कोटींचा गल्ला

काय म्हणाली कंगना रनौत?

तुम्हाला जाणवत असेल की, यांना सत्ता नाही मिळाली तर हे लोक कोणतही काम होऊ देणार नाही. जेव्हा यांच्याकडे संधी होती. तेव्हा यांनी भ्रष्टाचार केला. यांचं एकच म्हणणं आहे की, जर आम्हाला सत्ता नाही मिळाली तर आम्ही सर्वत्र अराजकता निर्माण करू. तसेच आता देश प्रगती करत आहे. तेव्हा विरोधी पक्ष दु:खी आहे. पण जनता सगळं पाहात आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाला कोणत्याही निवडणुका जिंकता येत नाही आहेत.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील त्यांना फटकारले आहे. कारण त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे. त्यांनंतर देखील त्यांनी येथे तमाशा केला. तसेच आयोगाने त्यांना त्यांनी केलेले आरोप लिखित स्वरूपात करण्यास सांगितले आहे. जेणे करून केस दाखल करत येईल. मात्र ते तसं करत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावे.

पिंक फ्लोरल साडीमध्ये तेजस्विनीचा सुंदर लूक

…अन्यथा देशाची माफी मागा

मुख्य निवडणूक आयुक्त (India Election Commission) (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मतचोरीसंदर्भातील आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत (Voter List) केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर त्यांनी सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र ( Affidavit) सादर करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना संपूर्ण देशापुढे माफी मागावी लागेल.

follow us