Imtiaz Jaleel : एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे धुळे (Dhule) जिल्ह्यादौऱ्यावर आले असता त्यांनी माजी आमदार फारुख शाह (Farooq Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर प्रथमच धुळ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी फारूख शाह यांच्यासोबत राज्य सरकारवर ही निशाणा साधला.
यावेळी त्यांनी राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन बंदी वर काढलेल्या परिपत्रकावर बोलत जोरदार टीका केली. तसेच भाजपाला (BJP) सत्ता मिळवण्याकरिता मुसलमानांची गरज होती म्हणून त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना आपल्या सोबत घेतले परंतु हे त्याचं षडयंत्र आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून मुसलमान बांधवांना खरेदी करायचं. जे मुस्लिम बांधव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे त्यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश करावा असा टोला माजी आमदार फारुख शाह यांना लगावला.
तसेच मुस्लिम समाज एक वेळेस आपला जीव देईल पण भाजपासोबत कधीच जाणार नाही कारण ज्या भाजपाने बाबरी मज्जिद पडली त्या भाजपासोबत मुस्लिम बांधव कधीच उभा राहणार नाही अशी देखील टीका इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अल्पसंख्यांक समाजातील युवकाची मॉबलिंचिंग करून हत्या झाली. या प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला इशारा दिला की जर लवकरच सुलेमान याच्या आरोपींना अटक केली नाही तर जेवढा मोठा मोर्चा मी मुंबई जाण्यासाठी काढला होता त्याहून मोठा मोर्चा मी जामनेर येथे घेऊन येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
अजितदादांचे ‘भावकी प्रेम’ राम शिंदेंच्या जिव्हारी! पवार-शिंदे वादाला नवे वळण?
धुळेचे माजी आमदार फारुख शाह यांनी काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने धुळे जिल्ह्यात एमआयएम पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.