Download App

मतचोरी प्रकरण, विरोधक आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी

Gyanesh Kumar : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) भाजप

  • Written By: Last Updated:

Gyanesh Kumar : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) भाजपला (BJP) मदत करण्यासाठी मतचोरीचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर देशातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरुन निवडणूक आयोग सध्या बॅकफूट वर दिसून येत असल्याने विरोधक आता आणखी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी करत आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर तसेच एसआयआरच्या मुद्द्यावर रविवारी 17 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने पुढील सात दिवसात राहुल गांधी यांना देशाची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Chief Election Commissioner Gyanesh Kumar) यांच्याविरोधात महाभियोग आण्याची तयारी करत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये सुरु असणाऱ्या एसआयआर आणि मतचोरीच्या विरोधात आता विरोधक आक्रमक भूमिका घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा निर्णय राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयएनडीआयएच्या फ्लोअर लीडर्सच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी पत्रकार परिषदेला कसे संबोधित केले आणि त्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे कशी दिली नाहीत यावर चर्चा केली.

War 2 ची तुफान क्रेझ; भारतात 4 दिवसांत गाठला 187 कोटींचा गल्ला 

माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या काही खासदारांना वाटते की ही लढाई पुढे नेली पाहिजे आणि त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उपस्थित केलेल्या शंकांचे उत्तर दिलेले नाही किंवा त्यांचे निरसन केलेले नाही म्हणून त्यांच्याविरुद्धचा लढा पुढे नेण्याची गरज आहे.

follow us