Ghaziabad Blast : गाझियाबादमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार गाझियाबादमधील (Ghaziabad) वैशालीच्या सेक्टर-4 मधील वॉक इन वुड्स हॉटेलमध्ये (Walk in Woods Hotel) गॅस रिफिलिंग (Gas Refilling) दरम्यान जोरदार स्फोट झाला. या स्फोटमध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृताचे नाव 35 वर्षीय पिंटू असून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव पुरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ghaziabad, Uttar Pradesh: An accident occurred at Gaur Gravity Heights commercial complex in Vaishali Sector 4, while refilling gas in an AC unit. A cylinder exploded, killing one person on the spot and critically injuring another, who is now hospitalized. The injured person’s… pic.twitter.com/Yph8A4I1yk
— IANS (@ians_india) May 31, 2025
एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉक इन वुड्स हॉटेल वैशालीच्या सेक्टर-4 मध्ये आहे. शनिवारी दुपारी दोन कर्मचारी हॉटेलच्या एसीमध्ये गॅस रिफिलिंगचे काम करत होते. त्यानंतर एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या घटनेत एसीला आग लागली आणि गॅस टाकणाऱ्या पिंटूचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार पुरण गंभीर जखमी झाला.
34 षटकांनंतर एक चेंडू अन् 5 बॅकअप खेळाडू, क्रिकेट बदलणार; ICC करणार मोठी घोषणा
माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे पिंटूला मृत घोषित करण्यात आले. तर पुरणची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.